भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांनी बहुप्रतीक्षित ‘उदार व्हिसा करार’ करून द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या करारात पर्यटक, यात्रेकरू आणि व्यावसायिकांना स्वतंत्र व्हिसा आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना आगमनानंतर व्हिसा उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तब्बल ३८ वर्षांनंतर हा करार करण्यात आला आहे. भारत पाकमधील या नवीन समझोत्यामुळे दोन्ही देशांदरम्यानचे व्यावसायिक संबंध दृढ करण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. सामूहिक पर्यटन व्हिसा दोन्ही देशांतील शैक्षणिक संस्थेत शिकणार्या विद्यार्थ्यांनाही मिळेल. तथापि, हा निव्वळ पर्यटन व्हिसा असेल. व्यावसायिक किंवा उद्योगपती किती काळ राहणार, याचा उल्लेख करणे जरुरी आहे. बिझनेस व्हिसा पाच आठवड्यात मिळावा.
Source : Marathi Unlimited.