भारताने दिलेल्या 141 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने जोरदार प्रहार करत भारताची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. पहिल्या सुपर ८ च्या लढतील भारतावर नऊ गडी राखून विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉटसन आणि वॉर्नरने तुफान फटकाबाजी करत १५ व्या षटकात सामना खिशात घातला. वॉटसनने ७२ आणि वॉर्नर ६३ धावांची शानदार खेळी केली. भारताकडून युवराज सिंगला केवळ एक विकेट पदरात पाडता आली. भारताची बलाढ्य फलंदाजी आज पुन्हा ढेपाळली. चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभाण्यात यश आले नाही. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 मधील सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 141 धावांचे माफक आव्हान दिले.
Source : Marathi News.