आजकाल फास्ट-फूड चा जमाना असल्यामुळे,तयार अन्न पदार्थ खाण्याकडे सर्वांचा कल दिसून येतो.अश्या अन्न पदार्थान मध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते. साहजिकच हे अतिरिक्त तेल शरीराला हानिकारक ठरते. चमचमीत अन्न पदार्थ, बैठीजीवन शैलीआणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना लठ्ठपणाला तोंड द्यावे लागते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय केल्या जात आहे. या उपायांवर अनेक प्रकारे खर्चही केला जात आहे. वास्तविक वजन कमी करण्यासाठी काही साध्या पध्दतीचा अवलंब करता येतो. आहार नियमित ठेवणे तसेच तो वेळच्या वेळी व योग्य प्रमानात घेतल्याने वजन नियंत्रनात येते. लठ्ठपणाची समश्या असणार्या व्यक्तीन्ने गोड पदार्थ कमी प्रमाणात घ्यावे. असे पदार्थ त्यांच्या करीता वेगळ्या प्रकारे बनविल्या जावू शकतात. त्यात साखरे ऐवजी सॉक्रीन चा वापर करता येतो. त्यामुळे पदार्थाची क्यलरीज कमी होतात. अश्या पदार्थात तेल, तूप, लोणी तसेच साखर आणि गुळ यांचे प्रमाण कमी करून क्यलरीज कमी करता येतात. साखरे ऐवजी ईतर गोडी आणणारे पदार्थ वापरल्यास त्याचा फायदा होतो. आहारा वर नियंत्रण ठेवण्या बरोबर हलका व्यायामही फायदेशीर आहे. हा व्यायाम तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शना खाली तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा,अश्या प्रकारे योग्य काळजी घेतल्यास वजन आटोक्यात ठेवणे शक्य होऊ शकते. व आरोग्य ही चांगले राहून प्रसंन्न्ता, कामाचा उल्हास ही वाढतो.
Source : Marathi Unlimited articles.