पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो हेदेखील हिना रब्बानीच्या सौंदर्यांने घायाळ झाले आहेत. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले असून लवकरच त्यांचा निकाह होणार असल्याची चर्चा जोरात आहे. मात्र आपल्या मुलाच्या या प्रेमावर राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांचा तीव्र विरोध आहे. यामुळे पितापुत्रांमध्ये कमालीचा बेबनाव निर्माण झाला आहे. १९ नोव्हेंबर १९७७ ला जन्मलेल्या हीना रब्बानी यांचे माहेर आणि सासर दोन्ही जमीनदार घराणे आहे. त्यांचे वडील पंजाब प्रांतातील बडे प्रस्थ आहे. उच्चशिक्षित हीना रब्बानी यांनी अमेरिकेत मॅनेजमेंटची पदवी घेतली. त्यांचा विवाह अब्जोपती फिरोज गुलजार यांच्याशी झाला असून त्यांना दोन मुली आहेत.. दोन मुलींची आई असलेल्या हीना रब्बानी या बिलावल यांच्यापेक्षा ११ वर्षांनी मोठ्या आहेत. त्यामुळे त्यांच्याशी निकाह करू नये म्हणून राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी बिलावल यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला.
Source: News Tv