घरगुती गॅसच्या दरवाढीवरून उडालेला राजकीय विरोधाचा भडका शमविण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. अनुदानाची सवलत लागू नसलेल्या सातव्या (काँग्रेसशासित राज्यांतील दहाव्या) आणि त्यापुढील प्रत्येक सिलिंडरवरील सीमा शुल्क तसेच केंद्रीय उत्पादन शुल्क रद्द करण्याचा निर्णय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज जाहीर केला. महाराष्ट्रातील जनतेला दहाव्या सिलिंडरसाठी आता जवळपास ९५ रुपये कमी मोजावे लागतील.
सिलिंडरचा भाव दिल्लीत बाजारभावानुसार ८९५ रुपये, तर अनुदानित ३९९ रुपये झाला होता. पण आता घरगुती गॅसच्या विनाअनुदानित सिलिंडरवरील ५ टक्के सीमा शुल्क आणि ८ टक्के केंद्रीय उत्पादन शुल्क पूर्णपणे रद्द केल्याने सहा सिलिंडरहून जास्त गॅस वापरणार्या ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे. अर्थात व्यापारी उपयोगासाठीच्या विनाअनुदानित सिलिंडरच्या गॅसवर हे दोन्ही प्रकारचे शुल्क कायम राहील.
Source : Marathi Unlimited.