गणरायाला निरोपाची सुरवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेश चतुर्थी मोठ्या हासर आणि उत्साहाने साजरी झाली. २९ – ०९ -१२ ला अनंत चतुर्दशी आहे. आणि बाप्पांना निरोप सुधा. पुण्यामध्ये विसर्जनाच्या दिवशी साडे आठ हजार पोलीस, एसआरपीएफच्या ६ तुकड्या, शीघ्र कृती दल, होम गार्डस, यांच्यासह निवृत्त पोलीस अधिकारी आणि स्वयंसेवक अशी सुमारे १६ हजारांची फौज शहरात तैनात असणार आहे. सुरक्षिततेबरोबरच मिरवणूक लवकर संपवण्याचं आवाहनही करण्यात आलंय. गेल्या वर्षी मिरवणूक संपायला २७ तास लागले होते. यावर्षी हा अवधी कमी करण्याचा प्रयत्न आहे. सर्वत्र कडक बंदोबस्त राहणार आहे.
Source : Marathi Unlimited.