गणपती पुळे विशेष
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Ganpati Pule wishes., You can read here complete information about the ganpati pule. this article is for ganpati pule. the lord god shri ganesha. ganpati pule maharashtra.

गणपती पुळे विशेष 
ganpati pule
श्री गणपती पुळे. परिचय
सह्यान्द्रीच्या रांगा मधील हिरवीगार वनराई, स्वच्छ सुंदर रुपेरी समुद्र किनारा तसेच आंबा, काजू, नारळ, पोफळी व वनस्पतीच्या हिरवळीने नटलेल्या निसर्गाची अप्रतिम उधळन असलेल्या सर्वांग सुंदर अश्या समुद्रकिनार्यावर कोकणातील गणपतीपुळेहे येथील गजाननाचे स्वयंभू देवस्थान तसेच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
श्रीं चे देवस्थान ईतिहास…..मुंबईहून ३५० कि.मी. असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळयांचे गणेश स्थान पेशवेकालीन व अति प्राचीन आहे. या सिद्धिविनायकाच्या स्थानाचा ईतिहास मुद्गल पुराणातील प्राचीन वाड्मयात पश्चिम द्वार देवता या नावाने आहे. या देवता आठ दिशांत आहेत, मोगलाईच्या काळात (साधारणपणे ई.स. १६०० च्यापुर्वी) आज ज्याठिकाणी स्वयंभू गणेश मन्दिर आहे. त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्या चे बन होते.या ठिकाणी बालभटजी हे ब्राम्हण राहात होते. ते गावाचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेन वर एक संकट कोसळले भिडे हे दृडनिश्चयी होते ‘आलेले संकट निवारण झाले तरच अन्न ग्रहण करीन. असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमुर्तीची उपासना करण्यासाठी केवड्याच्या वनात तपस्यां करण्याकरीता मुक्काम केला.तेव्हा त्यांना दृशांत झाला कि मी या ठिकाणी भक्तांच्या कामनापरिपूर्ण क्र्न्यासाअथि आगरगुळे (गणेशगुळे) येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रगट आहे निराकार डोंगर हे माझे आहे. माझी सेवा, पूजा -अर्चां कर म्हणजे तुझे संकटे दूर होईल. त्याच काळ खंडात भिडे यांची गाय सतत काही दुध देत नव्हती म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले, तेव्हा त्याला दिसले कि सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरा वरील एका शिळे वर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्यांनी खोतांना सांगितला. त्यांनी तत्काळ परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली त्या ठिकाणी गवताचे छप्पर धालून मन्दिर उभारले. आणि धार्मिक कृत्ये चालू केली. तसेच गणपतीपुळे हे नाव पडण्या मागे म्हणजे पूर्वी यागावात फारशी वस्ती नव्हती. मग गावच्या उत्तरेस थोडी वस्ती झाली. गावाच्या पश्चीम दिशेला उतरण असून बराच भाग पुळनवट हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो हिंदू सागर आहे त्या लगत गाव असून सकल देवतान मध्ये आराध्य देवता अशी श्री मंगल मूर्ती  आपल्या्थानाला योग्य ठिकाण  असे पाहून या समुद्र ठिकाणी निवास केला, समुद्रापुढे पुळनीचे भव्य मैदानात गणपती चे  महास्थान असल्यामुळे या गावाला ”गणपतीपुळे” असे म्हटले जाऊ लागले. निर्गुण गणेश स्वरूप मानल्या  गेलेल्या गणपतीच्या डोंगराचे क्षेत्रफळ २० एकर असून  ४००ते ५०० वर्षा पूर्वीचे प्राचीन आहे.त्यावेळी छत्रपतीनच्या आदेशावरून ८–८ आकाराचा  पारंपारिक वास्तू शिल्पाला अनुसरून चिर्याचे बांधकाम चुन्यात करून गाभारा तयार केला आहे. आत स्वयंभू गणेशाचे गंडस्थल व उदररुपी असणारी शिला व पार्श्व भूमीवर हिरव्यागार वनराईने नटलेले तेकडीरूपमस्तक या सर्व टेकडीलाच गणपती मानून प्रदक्षिणा घालण्याचे प्रथा येथे आहे.येथील सभामंडप सागवणी लाकडी पारम्पारिक कोकणी धाटनीचा आहे.उन्हाळ्यात शीतलता व हिवाळ्यात उब देणारा आहे. तेथे रमाबाई पेशवे धर्म शाळा निवास येथे भाविकांना अल्प- मोबदल्यात रहाण्या साठी सोय आहे. गणपतीपुळ्याचे मन्दिर ज्या गोल डोंगराच्या पायथ्याशी त्या भोवती अडीच हात रुंदीची फरस बंदी केलेली प्रदक्षिणेची पाखाडी आहे. पाखाडीच्या आंत चार दिशेला चार द्वार देवतांची स्थाने आहेत. डोंगरा भोवती वडाचे आणि अशवस्थाचे पारजागोजागी बांधले आहेत. दक्षिण भागी तलाव आहे यास वानीचे तळे म्हणतात धर्म शाळा पाक शाळा आहेत.
धार्मिक कृत्ये………… गणपती पुळे चे गणेश स्थान अतिप्राचीन महाराष्ट्रातील अष्टविनायकांपेक्षा हे अष्ट विनायक निराळे आहे. त्यांची नावे व स्थाने १) वक्रतुंड -मद्रास २) एकदंत केरळ ३)महोदर-रामेश्वर जवळ ४) गजानन -तंजावर ५) लंबोधर-गणपतीपुळे  ६) विकट-काश्मीर ७) विघ्नराज-हिमालय ८) धुर्मवर्ण-तिबेट.  भारत देशाचे हेच अष्टविनायक असून या देशाचे ते रक्षण करतात.भक्त येथे येऊन कृतकृत्य होतात.
परिसरातील दर्शन
१) गणपती पुळ्या पासून दोन किलोमीटर अंतरावर मालगुंड हे कोकणातील एक निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव आहे. या गावात एक मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत, यांचे घर आहे. त्यांचे स्मारक आहे. हे साहीत्यप्रेमींचे एक तीर्थ स्थान आहे.
२) किल्ले जयगड- कोकण किनार पट्टीवर हे सुरक्षित बंदर आहे.शास्त्री नदीचे मुखाशी असलेल्या  किल्ल्यामुळे या बंदर गावाला जयगड हे नाव मिळाले, येथील लीत हाउस, व जयगडची खाडी मनोवेधक आहे, तळसाव गाव जवळ गर्द झाडीत लपलेले ग्राम देवता महामाई सोनसाखळीचे मन्दिर आहे. रत्नागिरीपासून ३५ते ४० कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.
३) कऱ्हांटेश्वर—  १५ कि.मी अंतरावर कऱ्हांटेश्वरदेवस्थान परिसराचा नजारा पर्यटकांना आश्चर्य चकित करताना व खिळवून ठेवणारा आहे. हे जयगड पासून ४ते५ कि.मी. वर असलेले हे स्थान समुद्र किनार्यालगत असलेल्या नांदीवडे गावात येते.
४) लक्ष्मी  केशव मन्दिर हे कोळीसरे गावात डोंगर कुशीतगर्द वनराई मध्ये आहे. १२००० वर्षापूर्वी महाराष्ट्र देशावर राष्ट्रकुल सम्राटाची सत्ता होती.त्यांनी बरीच देवदेवता मन्दिरे बांधली. नंतर यादव सत्तेच्या काळात  मुसलमानांची आक्रमणे होत त्या काळात या देवतांची सुरक्षा साठी कोल्हापूर येथील रंकाला तलावात बुडवून ठेवण्यात आली. ती  मूर्ती वरवडे येथील जोशी, विचारे,  व काणे या आडनावाच्या तीन भक्तांच्या स्वप्नात आली. आणि तिला मग रंकाळा तलावातून काढून वरवडे खाडीतून गलबतातून नेत असता विश्रांती साठी कोळीसरे येथे उतरविण्यात आली दुसरे दिवशी पुढील प्रवासाला निघताना ती मूर्ती जागेवरून मुळीच हलेना ईतकी जड झाली.तेव्हा कोळीसर्याचे एक ग्रामस्थ भानुप्रभू तेरेदेसाई यांना झालेल्या दृष्टंता नुसार तिची कोळीसरे येथेच स्थापना करण्यात आली, सन १५१० साली मन्दिर बांधण्यात आले.
५) स्वामी स्वरुपांनदांचे पावस- रत्नागिरीपासून १६ कि.मी. अंतरावर हे एक निसर्ग रम्य तीर्थ स्थान आहे. त्यांच्या ”अभंग ज्ञांनेश्वरी ” या श्री ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचे अभंगवृतात केलेल्या अनुवादामुळे स्वामींनी ज्ञानेश्वरी प्रमाणेच ”अमृतानुभव” असाच अनुवाद केलेला आहे.तसेच ”अमृतधारा”व ” संजीवनीगाथा” सारखे बरेच अध्यात्मिक लेखन केलेले आहेत. आणि १५  आगष्ट १९७४ रोजी स्वामीजींनी पावस येथे समाधी घेतली.
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: