महागाईच्या मुद्यावर शिवसेनेनं जोरदार शक्तीप्रदर्शनं केलं. जवळपास सात ते आठ हजार शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत. सर्वसामान्यांना महागाईच्या आणखी खाईत टाकणारी डिझेल, गॅसच्या दरातील भरमसाठ वाढ तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी केंद्रातील सरकारविरोधात सेनेने दादरमध्ये शक्तीप्रदर्शन केले. डिझेलची दरवाढ, सवलतीच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या संख्येत केलेली कपात आणि रिटेलमध्ये विदेशी थेट गुंतवणुकीला दिलेली परवानगी याच्या विरोधात विरोधी पक्षांनी गुरुवारी २0 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ पुकारला आहे.
भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. रालोआने पुकारलेल्या या बंदमध्ये अन्य पक्षांनीही सामील व्हावे, यासाठी त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत. बंदमध्ये रालोआचे सर्व घटक पक्ष सामील होतील, असे अडवाणी यांनी सांगितले. डावी आघाडी, बिजद आणि तेलगू देसम पार्टीनेही २0 सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा स्वतंत्रपणे केली असून, सरकारवर दबाव आणण्यासाठी समाजवादी पार्टी आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
Source : News Tv.