ठाकरे घराणं मूळचं बिहारचंच असं पुराव्यानिशी सांगणाऱ्या दिग्विजय सिंग यांच्यावर उद्धव ठाकरेंनी निशाना साधलाय. ठाकरे घराणं हे मूळचं बिहारचं आहे, याबद्दल साफ नकार देताना उद्धव ठाकरेंनी ‘दिग्विजय सिंग यांचं डोकं फिरलंय’ अशी प्रतिक्रिया दिलीय.
दिग्विजय सिंग यांनी पुरावा म्हणून सादर केलेल्या पुस्तकात ठाकरे घराणं बिहारचं असल्याचा कुठेही उल्लेख नाही… या पुस्तकात मराठीबद्दल सांगितलं गेलंय, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय.
युतीच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारने प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्र चरित्र प्रसिद्ध केले होते. प्रबोधनकार हे राज ठाकरे यांचे आजोबा आहे. या पुस्तकात ठाकरे कुटुंबियाच्या इतिहासावर काही विस्तारीत स्वरूपात माहिती आहे.
Source : Online Updates.