सीएसटी हिंसाचारामागे दाऊद इब्राहिम याचा हात असल्याचे समजते. रझा अकादमीच्या आंदोलनावेळी आझाद मैदान आणि सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचारामागे कुख्यात दाऊद इब्राहिमचा हात असल्याचे गुप्तचर संस्थेने म्हटले आहे. या प्रकरणी गुप्तचर संस्थेने महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला सुचित केले आहे. आंतरराष्ट्रीय टेलिफोनिक चर्चेच्या आधारे गुप्तचर संस्थेने ही माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दंगलीच्या दुस-याच दिवशी यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचे म्हटले होते.
Source : News Tv.