नवी मुंबई परिवहन सेवेनं आजपासून भाडेवाढ लागू केलीय. एन.एम. एम.टी ला दर महिन्याला 1 कोटी 47 लाखांचा तोटा होतोय. हा तोटा भरण्यासाठी, तसंच डिझेलचे दर वाढल्याने ही भाडेवाढ केली असल्याचं परिवहन तर्फे सांगण्यात येतंय. भाडेवाढीमुळे या बसेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांच्या खिशाला चाट बसणारय. प्रवाशांनी या दरवाढीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
Source : Online News