Bharatachya pragaticha marg. this article gives you how to develop India and work on the progress of india. India need a development.
भारत आणि त्याचा उत्थानाचा मार्ग!
”धर्माला धक्का न पोचविता सर्व सामान्य जनतेची सर्वांगीण उन्नती” हे ध्येय वाक्य समोर ठेऊन होईल. त्यांच्या ठिकाणी जी धर्मपरायणता आहे. ती नष्ट ण करता आपण त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिकवायला पाहिजे.समता, स्वतन्त्रता, कर्मशीलताव उत्साह यांच्या बाबतीतआपण सच्चे पाश्चात्य आणि धर्मविश्वासव धर्मसाधना यांच्या बाबतीत सच्चे हिंदू होऊ शकता कां? हा आदर्श समन्वय तुम्हांला साधेल काय ? हेच कार्य आपल्याला करावयाचे आहे. * धर्म हि भारत वर्षाची जीवनशक्ती आहे. जर तुम्ही धर्माला बाजूला सारून राजकारण, समाजकारण किंवा आणखी काही जीवनाचे केंद्र म्हणून किंवा राष्ट्राची जीवनशक्ती म्हणून स्वीकारलं तर याचा परिणाम असा होईल कि तुमचा पूर्णपणे नाश होईल. हा नाश टाळायचा असेल तर तुम्हांला प्रत्येक गोष्ट तुमची जीवनशक्ती, व जो धर्म आहे त्याच्या आधारेच केली पाहिजे. प्रत्येक सुधारणे साठी धार्मिक स्वरूपाची चळवळ प्रथम हाती घेतली पाहिजे. भारतामध्ये समाजवादी, किंवा राजकीय कल्पनांचा पूर वाहण्यापूर्वी प्रथम अध्यात्मिक विचारांचा पूर वाहवून जाऊ द्या. कारण धर्म हि मुख्य गोष्ट आहे. भारतीय मन हे प्रथम धर्मशील आहे अन्य गोष्टी नंतर येतात. भारतीय नवीन समाज पद्धती अध्यात्मिक जीवनाला कितपत साहाय्यभूत ठरू शकेल हे दाखवूनच समाज सुधारनांचा प्रचार करावा लागेल आणि राजकीय तत्वे शिकवितानाही ती राष्ट्रांच्या आध्यत्मिक गरजा कितीशा भागवू शकतील हें प्रथम दर्शवावे लागेल. [स्वामी विवेकानंद ग्रंथावली ५.१३१ ]
फक्त धर्माद्वारेच नव्हे!
लोकांसाठी प्रथम अन्नाची व्यवस्था केली पाहिजे. आणि मग धर्माची गरिबांना काम मिळण्या द्रुष्टीने भौतिक सभ्यतेचीच नव्हे तर विकासाची आवश्यकता आहे. भारताचा उद्धार करायला हवा. शिक्षणाचा प्रसार करायला हवा. आणि पुर्र्रोहितगिरी नष्ट करायला हवी. आपल्या प्राचीन धर्मातून पुरोहीतगिरी काढून टाकली तर जगातील सर्वोत्कृष्ट घर्म आपल्याला प्राप्त होईल. भारतीय घर्म तसाच ठेऊन त्याला युरोपीय समाज जीवनाची जोड देता येईल. व तसे करायलाच हवे.स्त्रियांना योग्य सन्मान द्या!
आधी स्त्रियांना उद्धार करावयास हवा. सर्व सामान्य जनतेत जागृती उत्पन्न करावयास हवी. कारण स्तीयांना सन्मान देऊनच सारे देश उन्नत झाले आहे. ज्या देशात ज्या जातीत.स्त्रियांना योग्य सन्मान होत नाही तो देश, ती जातकधीही उन्न्तावस्थेत पोहोचू शकत नाही, आणि कधी पोहोचूही शकणार नाही.
[ग्रंथावली ६.१३९]शिक्षण हि तातडीची गरज आहे!
खालील वर्गातील लोकां संबंधी आपले कर्तव्य हेच आहे कि आपण त्यांना शिक्षण दिले पाहिजे. आणि त्यांना स्वत:च्या व्यक्तित्त्वाचा जो विसर पडलेला आहे त्याची जाणीव करून देऊन त्यांचा विकास केला पाहिजे. त्यांच्या समोर चांगले विचार ठेवले पाहिजे. जगात कुठे काय चालले आहे हे त्यांना दाखविले पाहिजे. प्रत्येक मनुष्याने राष्ट्राने, तसेच स्त्री -पुरुषाने स्वत:स्वता:चा उद्धार केला पाहिजे. त्यांच्या समोर सत्य जोपर्यंत येत नाही, केवळ हीच मदत त्यांना हवी आहे. बाकी सारे त्यांच्या परिणामी आपोआपच घडून येईल. त्यांच्या डोक्यात काही चांगल्या विचारांचा काही चांगल्या कल्पनांचा शिरकाव केला पाहिजे. भारतात सध्या याच कार्याची गरज आहे. दोषांची जाणीव फक्त मुठभर लोकांनाच झाल्यानी सर्व राष्ट्र क्रियाशील होणार नाही. प्रथम राष्ट्र सुशिक्षित करणे महत्वाचे आहे. सामाजिक सुधारणे साठी लोकांना शिक्षण देणे जरुरीचे आहे. “स्वावलंबन” लोकांना स्वत:च्या पायावर उभे राहणे जर शिकवले नाही तर भारतातील एखाध्या लहानश्या खेड्याच्या मदतीसाठी सगळ्या जगाची धन दौलतसुद्धा अपुरी पडेल. आपल्या कार्याचे स्वरूप मुख्यत: शैक्षणिक असावे. नैतिक आणि बौद्धिक असे दोन्ही प्रकारचे शिक्षण आपण द्यावे.पूर्व आणि पश्चिम देवान घेवाण, आदानप्रदान हा प्रकृतीचा नियम आहे. भारताला आज पुन्हा उठायचे असेल तर त्याने आपल्या भांडारातील अमोल आध्यत्मिक संपदा देशोदेशी मुक्त हस्ताने विखरून द्यावयास हवी. व याच बरोबर अन्य देशांपासून जे घेण्या सारखे आहे. त्याचाही स्वीकार करण्यास तयार असले पाहिजे. विस्तार पावणे हेच जीवन आहे. आणि संकोच पावणे हा तर मृत्यू होय. प्रेम हेच जीवन होय. व घृणा म्हणजे मृत्यू अन्य जातीची घृणा केल्यापासून आपले मरण सुरु झाले असे समजावे, हा मृत्यू थांबवायचा असेल तर आपणाला विस्तारशीलतेची कास धरावी लागेल. पृथ्वीच्या पाठीवर असणार्या सर्व जातींशी आपण मिसळले पाहिजे व कुणाशीच उतार चढाव करता कामा नये. सर्व समसमान असेच समजावे. परिपूर्ण संस्क्रूतीसाठी जग वाट बघत आहे. पुर्वजांपासून वारसा म्हणून भारतात प्राप्त झालेली घर्मसंपदा भारता कडून सर्वांना मिळावी यासाठी जग आतुर झालेले आहे. कित्येक शतकांचे पतन,दुर्गती यामध्येही उराशी कवटाळून ठेवलेली अपूर्व आध्यात्मिक संपदा मिळावी म्हणून जग वाट पाहत आहे. म्हणून आपण आपल्या देश्याच्या बाहेर पडले पाहिजे. त्यांच्या कडे जे देण्या सारखे आहे ते घेऊन त्याबदल्यात त्यांना अध्यात्मिकता दिली पाहिजे, आपल्या जवळ असणारी आध्यात्मिक क्षेत्रातली अपूर्व तत्वे त्यांना देवून भौतिकक्षेत्रातली अपूर्व तत्वे आपण घेतली पाहिजे. आपण सदैव शिष्यच न राहता गुरु पण झाले पाहिजे. समान झाल्या शिवाय मैत्री होऊ शकणार नाही. इंग्रज व अमेरिकन लोकांच्या बरोबरीचे व्हावयाचे असेल तर त्याच्या पासून शिकण्या बरोबर त्यांनाहि आपण शिकविले पाहिजे. जगाला आगामी कित्येक शतके देता येईल ईतका आध्यात्मिक ज्ञांनाचा साठा हि आपल्या जवळ आहे. हिंदुस्थानाला परकियांच्या बाह्य प्रकृतीवर विजय मिळविण्यासाठी विद्या शीकवायची आहे. व त्यांना हिंदुस्थानाजवळून अंत:प्रकृतीवर विजय मिळविण्या साठी विद्या प्राप्त करावयाची आहे.तसे झाले कि मग हिंदूही उरणार नाही. व वेगळे असे युरोपीय वा अमेरिकनहि उरणार नाहीत. फक्त अंतर-बाह्य प्रकृतीवर विजय मिळविणारी आदर्श अशी एकच मानव जात विश्वात नांदेल.आपण मनुष्यत्वाचे एक अंग विकसित केले आहे. तर त्यांनी दुसरे अंग विकसित केले आहे.या दोहोंचा मिलाप होणार हेच आपणास हवे आहे.
भारतीय परंपरे वरच नवा भारत उभारणे योग्य राहील!
आपल्या प्रकृती धर्मा नुसारच आपण विकास साधला पाहिजे. विदेशी संस्थांनी आपल्यावर लादलेल्या जीवन पद्धती नुसार जीवन घडविणे व त्यांच्या कार्य पद्धती नुसार कार्य करणे निष्फळ आहे. त्यांच्या साठी ते योग्य असेल पण आपल्यासाठी त्या योग्य नाहीत. त्यांना जे उपकारक असेल ते आम्हाला विषतुल्य ठरू शकते. हे लक्षात ठेवणे फार सर्वात महत्वाचेआहे.आपल्यापासून भिन्न अशी त्यांची शास्त्रे, त्यांच्या संस्था, त्यांची परंपरा यामधून त्यांची सध्याची जीवनपद्धती व कार्यपद्धती परिणत झाली आहे. आपल्या पाठीशी आपली वेगळी अशी परंपरा आहे, आपले हजारो वर्षाचे कर्म आहे. म्हणून आपण स्वाभाविकपणे आपल्याच पद्धतीने कार्य करू शकू. आणि आपणाला आपल्याच पद्धतीने करायला पाहिजे.
[ स्वामी विवेकानंद ग्रंथावली ५.१२९ -३० ]राष्ट्राच्या शिल्पकारांना आव्हान
देशभक्त व्हा आणि आपल्यासाठी गतकाळात अशी महान कार्ये करनाऱ्या या राष्ट्रा बद्दल प्रेमभाव बाळगा.माझ्या शूर युवकांनो प्रेम, सच्चेपणा, धीर, याची फार आवश्यकता आहे. जीवन म्हणजे विकास, विस्तार, प्रेमं; म्हनूण प्रेम म्हणजे जीवन आणि तेच जीवनाच्या गतीचे नियमन करते; स्वार्थ परायणता म्हणजेच मृत्यू आणि हे या लोकात, परलोकात, सर्वत्र काळी सत्य आहे, दुसर्याचे कल्याण करणे म्हणजेच जीवन अवतीभवती वावरणार्या मानव पशुंपैकी नव्वद टक्के लोक मेल्यागतच असतात. हि माणसे म्हणजे भुते होत. कारण ज्यांची हृद्य प्रेमाने ओथंबलेले नसतात अशी माणसे मृतच समजायची !
दुखी, गरीब, अज्ञांणी यांच्या साठी तळमळ वाटून हृद्य व्याकुळ होऊ द्या. तुम्हाला त्रास झाला तर भगवंताच्या पदपद्मी निवेदन करा. तेव्हाच ते तुम्हाला सहाय्य करतील व अदम्य उत्साह देतील.झुंजा व झुंजत झुंजत पुढे पाउल टाका.आणि चलत राहा, वत्सांनो भिऊ नका, आशेच्या प्रकाशाने दश दिशा किंचित उजळत असताना तोच मंत्र जपा “झूंजा झुंजा झुंजत झुंजत पुढे चला” तेव्हा तूम्हाला असे दिसून येईल कि पैशाने, नावलौकीकाने, विदेने कशाने हि काही साधता येत नाही एक मात्र प्रेमानेच सारे साधता येते. संकटाच्या अभेद्य भिंती चारित्र्याच्या बळाने पाडून टाकता येतात व योग्य असा महत्वाचा मार्ग मोकळा होतो.
कोणत्याही व्यक्तीला किंवा राष्ट्राला थोर होण्यासाठी पुढील तीन गोष्टींची आवश्यकता आहे (१)चांगुलपनाच्या शक्तीवर प्रगाढ विश्वास (२) मत्सराचा आणि संशयखोरपनाचा अभाव (३)जे चांगले बनण्याचा व चांगले करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या सर्वांना सहाय्य करणे. लहान कार्यातूनच मोठी कार्ये उत्पन्न होत असतात. धैर्य व धीर सोडू नका. आपल्या बांधवांचा नेता होण्याची धडपड करू नका, त्याचे सेवक व्हा. नेतेगीरीच्या या पाशवी प्रवृत्तीने जीवनरूपी माहासागरात अनेक मोठमोठी जहाजे बुडवून टाकलेली आहेत म्हणून या बाबत अत्यंत सावध राहा. मृत्युला देखील तूछ लेखून शेवट पर्यंत संपूर्ण निस्वार्थपणे कार्य करा. प्रत्येकाला तुमचा विस्वास असू द्या, कि तुम्ही महान कार्ये करण्यासाठी जन्माला आलेले आहात. जनतेला घाबरवू नका व तुम्ही पण घाबरू नका. कार्याला सामोरे जा. थोरामोठ्या श्रीमंतांकडून एखादे महत्कार्य पार पडलेले आहे असे एखादा तरी दाखला जगाच्या ईतिहासात मिळतो काय? महान हृदयाच्या थोर बुद्धीच्या बळावरच असली कार्ये होतात. पैश्याच्या बळावर नव्हे. पैसे आणि ईतर गोष्टी आपोआपच चालत येतील. आपल्याला माणसाची गरज आहे. सारे काही मनुष्यच करीत असतो.व जितकी मिळतील तितकेच चांगले. जगातल्या सार्या संपत्तीपेक्षा ‘माणसेच अधिक मोलाची असतात.कोणी काहीही विचार करोत तुम्ही पावित्र्य, नैतिकता आणि भगवत प्रेम यांवरील तुमचा आदर्श खाली ओढू नका. यात जादुगीरीची काही एक गरज नाही. जादूचे भय बाळगण्याचे कारण नाही. ईह लोकात नव्हे तर स्वर्ग लोकात सुद्धा पावीत्र्य हि सर्वात मोठी अशी दैवी शक्ती आहे. तथाकथित श्रीमंतांवर भरवसा ठेऊन चालू नका. ते एका अर्थाने मेलेलेच आहेत. असे म्हणायला काहीच हरकत नाही. आता भरवसा आम अश्या सामान्य जनतेचाच आहे. जे गरीब आहेत, ज्यांना समाजात स्थान नाही, पण ज्यांच्या ठाई अपूर्व विश्वास आहे.त्यांचाच भरवसा आहे. मदतीसाठी तथाकथित श्रीमंत आणि मोठ्या लोकांच्या तोंडाकडे पाहू नका. तेही हृद्यशुन्य असतात, तसेच हृद्यशुन्य बुद्धिवादी लेखकांची आणि वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होणार्या त्यांच्या सहानुभूती शून्य लेखनाची पर्वा करू नका.जळजळीत विश्वास, जळजळीत सहानुभूती! जीवन-मरण, तहान-भूख, थंडी-वारा कशाचीही तमा बाळगू नका, आणि प्रभूचा जयधोष करा! पुढे, पुढे चला चलत राहा. मागे वळून बघू नका, कोण पडला ते पाहू नका, जर कोणी पडला तरी त्याची जागा तात्काळ कोणी तरी घेईल. तुम्ही पुर्णपणे निष्कपट व्हावे तुम्हाला जीवनसमरात वीरोचीत मरण यावे हीच सतत प्रार्थना करणारा.
विवेकानंद ……….. (ग्रंथावली २.४०० )भारताचे भवितव्य !
ह्या भारताचा काय नाश होईल? तसे झाल्यास जगाची सारी आध्यात्मिकता अस्तास जाईल, नीतीचे महान आदर्श लयास जातील,धर्माविषयीचा मधुर सहानुभूतीचा भाव नाहीसा होईल, आदर्श-निष्टा पार निमावल्यासारखी होईल. आणि त्या रीत्या स्थानी स्थापना होईल कामदेव- आणि विलासिता देवी यांच्या जोड मूर्तीची! पैसा होईल त्यांचा पुरोहित, फसवेगिरी, पाशवी बल आणि स्पर्धा हि होतील त्यांच्या पुजेची पद्धती आणि मानवात्मा होईल त्यांचा बली !— छे छे असे होणे कदापि शक्य नाही. सहनशक्ती कार्यशक्तीहून अनंतपट श्रेष्ठ आहे, प्रेमशक्ती, घृणाशक्तीहून अनन्तपट अधिक शक्तिमान आहे. प्राचीन भारतात अश्या चांगल्या अनंत गोष्टी होत्या आता त्याचे जतन झाले पाहिजे. हे खरे परंतु होऊ घातलेला भारत आणि उद्याचा भारत हा प्राचीन भारता पेक्षा खूपच महान असला पाहिजे. भारत पुन्हा उठेल. यात संदेहच नाही, पण जडाच्या शक्तीने नव्हे, चैतन्याच्या शक्तीने, ध्वंश-विनाशाचा झेंडा नाचवून नव्हे, शांती-प्रेमाची विजय पताका फडकवीत-संन्याश्याच्या काषायवस्त्राच्या सहायाने. धनाच्या बलाने नव्हे भीक्षापात्राच्या शक्तीने, एक जिवंत दृश्य माझ्या दृष्टीला दिसत आहे,ते हे की आपली प्राचीन “भारतमाता” पुनश्च जागृत झाली आहे. नव संजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महीमाशाली होवून आपल्या सिंहासनावर गौरवाने अधिष्ठित झाली आहे.
[स्वामी विवेकानंद ग्रंथावली २.२३,२४ ]Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..Source : Marathi Updates.
1 Comment. Leave new
Very good article…