डिझेल भाववाढ, मल्टिब्रॅण्ड रिटेल उद्योगात थेट परकीय गुंतवणुकीस संमती, या दोन निर्णयांबाबत कोणत्याही स्थितीत माघार न घेण्याची खंबीर भूमिका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतली आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल, वाणिज्य मंत्री आनंद शर्मा व गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपापल्यापरीने ममता यांची समजूत काढण्यासाठी दिवसभर शर्थीचे प्रयत्न केले. खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही रात्री चर्चेची तयारी दाखविली. इतकेच नव्हे, तर डिझेलच्या दरात एक रुपयाची कपात करण्याची व सहाऐवजी अनुदानित दराने ८ सिलिंडर असा अहमद पटेल यांचा देकारही ममतांनी फेटाळला. सरकारला धोका नाहीच! सत्ताधारी यूपीए सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांना काही घटकपक्षांनी विरोध केला असला, तरी सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट करीत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे सोमवारी जाहीर केले.
Source : Online Updates