आध्यात्मिक संत आसाराम बापू यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. गाजियाबाद दौऱ्यावर असणाऱ्या आसाराम बापू यांनी व्हिडिओ पत्रकाराला थोबडले. सार्वजनिक ठिकाणी पत्रकाराला मारल्याप्रकरणी आसाराम बापू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी न्यूज चॅनेलसाठी आसाराम बापू यांच्याशी संपर्क केला गेला. गाजियाबाद येथे तिन दिवस बापू यांचा सत्संगचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी बापू येणार होते. त्यांची विचारपूस आणि माहिती घेण्यासाठी तेथे पत्रकार गेले होते. यावेळी बापूनी व्हिडिओ पत्रकाराच्या कानाखाली लगावली. हेलिकॉप्टर दुर्घटनेत मी वाचलो कारण, मी खूप शक्तिशाली आहे. मला कोणतीही इजा पोहोचलेली नाही. हेलिकॉप्टरचे तीन तुकडे झालेत . याबाबत बापू यांनी पत्रकारांना मी जे काही म्हणतो, त्याचे शुटींग करा असे फर्मान सोडले. मात्र, काही बोलने व्हिडियो पत्रकाराने रिकॉर्ड केले नाही. त्यामुळे बापू संतप्त झाले आणि त्याच्या कानाखाली लगावली.
Source : Marathi Unlimited.