ऐश्वर्या झाली संयुक्त राष्ट्रांची गुडविल अँम्बॅसेडर
संयुक्त राष्ट्रातर्फे एचआयव्ही-एड्सबाधितांसाठी चालविल्या जाणार्या यूएनएड्स कार्यक्रमाची सदिच्छा राजदूत म्हणून बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची नियुक्ती करण्यात आली आहे.
एचआयव्ही संसर्गापासून लहान मुलांचे संरक्षण व एचआयव्हीवर उपलब्ध उपचार याबाबत सर्वसामान्य लोकांत जागरूकता निर्माण करणे हे काम ऐश्वर्याकडून केले जाईल. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेची वार्षिक बैठक सुरू होण्याच्या आदल्याच दिवशी ऐश्वर्याची ही नियुक्ती करण्यात आली आहे. यूएनएड्सचे कार्यकारी संचालक मायकेल सिड्बी यांनी पत्रकार परिषदेत ऐश्वर्याचे यूएनएड्स परिवारात स्वागत केले.
ऐश्वर्याचे जगात लाखो चाहते आहेत, जगातील लोकांना तिच्याबद्दल आदर व प्रेम आहे. तिची ही लोकप्रियता लक्षात घेऊन यूएनएड्स कार्यक्रमासाठी तिची निवड करण्यात आली आहे. २0१५ सालापर्यंत लहान मुलांना होणारा एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यास तिला नक्कीच यश मिळेल, असे सिडबी यांनी सांगितले.
Source : Online News : Aishwarya now international goodwill ambassador