अध्यात्म लक्षात ठेवू या !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Adhyatma lakshat asu dya.. this article contain information on adhyatma and social affairs. must read this for getting information about adhyatma.

adhyatma visheshविश्वात असा कोणीही नाही ज्याच्यात काहीच दोष नाही, ज्याने कधीच गुन्हा केला नाही. पण  दुसर्याची चूक पाहून त्याच्या बद्दल गैरसमज करू नका.परंतु त्याच चूका आपल्यात होणार नाही ते लक्षात असू द्या. दुसर्या कडे पाहताना किंवा समजताना त्याच्या दृष्टीकोनातून व त्याच्या परिस्थितीत पोहचून पहा. मग त्याची चूक हि चूक वाटणार नाही.   **असे कधीच समजू नका कि दुसर्याला सुधारण्या करीता आपला जन्म आहे. प्रथम स्वत:ला सुधारण्याची कोशिश करा व सुधारा तेव्हा तुमच्या कडे बघून दुसरा आपोआपच स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करील. ** जे फक्त दुसर्याला शिकवण्यात वेळ घालवतात व स्वत: च्या शिकवणुकी वर स्वत: अमल करीत नाही ते स्वत:ला व सर्वांला धोका दायक असतात.

*** ज्याचे जीवन सुंदर आहे, शुभ आहे, वास्तविक तोच सुंदर आहे. परंतु ज्याची भाषा सुंदर आहे पण जीवन कलुषित आहे तो पूर्ण कलंकित आहे. प्रती क्षण आपल्या मनात थोडासाही दोष दिसत असला त्याला लगेच काढण्याची कोशिश करा.तुम्ही स्वत: सुधारले कि एकांतात सुद्धा असले तरी तुमच्या सुवासाने संपूर्ण जगाला सुख व कल्याण प्राप्त होईल. दुसऱ्यान सोबत असाच व्यवहार करा कि तुम्हाला दुसर्यांकडून ज्या व्यवहाराची प्रतीक्षा आहे. दुसर्यांच्या सद्गुणानाच बघा. व गर्व सोडून नम्रताने त्यांच्या सद्गुणांना ग्रहण करा. उदाहरणार्थ: जसा धनाचा लोभी मनुष्य धन जमविण्यात मग्न असतो, तो व्याख्याने देत बसत नाही. तसेच दैवी, सदगुणांची संपत्ती जमा करा. बोलबाला न करता दिंडोरा न पिटविता.

***  प्रेम, सहानुभूती, सम्मान, मधुर वचन, सर्वतापरीहित, निश्चल सत्य, अश्याच व्यवहाराने तुम्ही दुसर्यास आपला बनवू शकता, या सर्व गोष्टी असल्यास लोक तुमच्यासाठी मोठ्यात मोठे त्याग करण्यास तयार होतात. तुमच्या बद्दललोकां च्या मनात मधुर व प्रिय असे सुरक्षितस्थान तयार होते. तेव्हा तुम्ही सुखी होऊन तुमच्या सहवासाने सर्वांला सुख व शांती प्राप्त होईल. त्यांच्या सुख शांतीतून तुम्हाला जसे एका बी मधून असंख्य फळांची प्राप्ती होते तसेच सुमधुर सुखांचे परिणाम तुम्हाला मिळतील. म्हणून तुम्हाला सुख पाहिजे असल्यास दुसर्यास सुख द्या, प्रेम हवे असल्यास प्रेम द्या. सर्वांच्या हिताची,सम्मानाची चाहत ठेवा. जगतात शांती पूर्वक राहून अंत: अंनन्त शांती प्राप्त करा. त्या साठी सुकर्माचे अनुष्ठान  नित्य करीत रहा  त्यातच तुमचे कल्याण आहे. ( शिव)  ज्याच्या हृदयात नित्य — सत्य, न्याय, प्रेम, क्षमा, धैर्य, ईमान्दारि, संतोष, शांती, त्याग आणि आनंद विराजमान आहे किंवा खेळत असते.त्याचे जीवनहि तसेच बनुन जाते, त्याकरिता निरंतर शुभ विचारांचे चिंतन आवश्यक आहे. *** जो पर्यंत अशुभ विचार– मिथ्या, अन्याय, द्वेष, क्रोध, लोभ, असहिष्णुता, बेईमानी अशांती, भोगविलास हे सर्व हृदयात घर करून बसलेले आहे, तो पर्यंत मनुष्य सुखी व पवित्र असे जीवन जगू शकत नाही. या सर्व गोष्टीतून मुक्ती व्हायला हवी. पण या सर्व गोष्टी काढून टाकायच्या म्हणून नुसतेच चिंतन करून चालणार नाही. त्या चिंतनाने ते पुन्हा प्रगाढ होत जाईल.

आपल्याला एखादी कल्पना मनातून काढण्यासाठी आपण तिचाच विचार करीत असतो पण तों न संपता तोच पुन्हा पुन्हा मनात प्रगट होत राहतो व दूर होण्याचे नावच घेत नाही. शेवटी घर करून बसतो. त्याकरिता आपण त्या अशुभ विचाराला बाहेर करण्याचा विचार न करताच शुभ चिंतन करणे सुरु करणेच योग्य असते.जगातील प्रपंच्याच्या किंवा विश्वातील पापांच्या विनाकारण विचार करण्यापेक्षा परमेश्वराचे मंगलमय, कल्याण स्वरूप, द्याळूभाव, प्रेम, भक्तवत्सलता, महत्ता, सत्यस्वरूपता, शांतीमयता, आनंदमयता, निष्कामता, परिपूर्णता, सर्वहितैषीता, समता ई. महान दिव्य गुणांचे स्मरण करायला पाहिजे. ईश्वराच्या तत्वाचे मनन, चिंतन आरंभ करायला पाहिजे. प्रभू च्या सुंदर कथा पुराण,श्रवण करायला पाहिजे. त्याचा अभ्यास करायला पाहिजे. ध्यान धरायला पाहिजे. व त्याचेच ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. म्हणजे अशुभ विचार मनातून आपोआपच नष्ट होतील. म्हणूनच म्हटले कि शुभ विचार आणण्यासाठी अशुभ विचारांचे स्मरण अजिबात करू नयेत. अशुभचे स्मरण म्हणजेच अशुभला जीवित व प्रतिष्ठीत ठेवणे आहे.

*** सर्व जग भगवंताचेच बनविलेले आहे,त्यामुळे प्रत्येकात भगवंतच आहे अत: जग हे सर्वत्र सर्वथा कल्याणमय गुण समुहाने भरलेला आहे. तुमचे आंत्रिक मन किंवा डोळे तमोमयी  वं अशुभ दर्शनशिला असल्यामुळे  तुमचे मन निरंतर  अशुभ क्रीडा प्रांगणात भटकत असते. व दिवस रात्र  अशुभसमुहाच्या धमाचौकडीत फिरत असते. ते कितीही मनातून काढण्याचा प्रयत्न केल्यास विफल आहे. तेव्हा ती मनातील कल्पना दूर करण्या आधीच मंगलमय विचारांना हृदयात स्थान देणेच योग्य आहे. जसे सूर्योदय झाल्यास अंधक्कार आपोआपच नष्ट होतो.

Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu