आपल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांच्या अंतरंगात पोहचण्याचा प्रयत्न करणारा आमिर खाननं आता टाईम मॅगझिनच्या कव्हर पेजवरदेखील स्थान मिळवलंय. टाईम मॅगझीनच्या कव्हर पेजवर जागा मिळवणारा आमिर पहिला भारतीय पुरुष अभिनेता आहे.
नुकत्याच ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांवर आवाज उठवून सगळ्या देशात आमिरनं एकच खळबळ उडवून दिली होती. आमिरनं सामाजिक प्रश्नांना मोठ्या खुबीनं पकडून तो लोकांच्या निदर्शनास आणून देता देता बॉलिवूडकरांनाही धक्का दिलाय. टाईम्सनं आमिरच्या याच विशेषत्वाला रेखाटलंय. जिज्ञासा आणि नव्याची आस या आमिरच्या गुणांनाही त्यांनी उजाळा दिलाय. ‘एक अभिनेता देशाला बदलू शकतो का?’ असा प्रश्नही यामाध्यमातून टाईम्सनं यावेळी विचारलाय.
Source : Bollywood News.