कुस्तीमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक जमा केले. ६० किलो वजन गटात फ्रिस्टाईल कुस्तीत योगेश्वररने पहिला फेरी गमावल्यानंतरही रिपेचेजमध्ये आलेल्या कांस्य योगाचा अचूक फायदा घेत ऐतिहासिक कामगिरी केली. निर्णायक लढतीत त्याने उत्तर कोरियाच्या जो मायुंग राईला ३-१ ने लोळविले. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारताला पदक मिळवून देणारा योगेश्वकर तिसरा मल्ल ठरला. यापूर्वी खाशाबा जाधव (हेलान्सिकी १९५२) सुशील कुमार (बीजिंग २००८) यांनी अशी कामगिरी केली आहे.
Source : News TV