विलासराव देशमुख यांना चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून लिव्हरला सूज आली आहे. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. विलासराव देशमुख सध्या ते डायलिलिस आणि व्हेंटिलेटरवर आहेत. देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी सायंकाळी तातडीने चेन्नईत हलविण्यात आले. त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेले काही महिने देशमुख यांची प्रकृती ठिक नसून, मध्यंतरी परदेशात जाऊन त्यांनी उपचार करून घेतले होते.
Source : Marathi News TV.