व्हीव्हीएस लक्ष्मणने आंतरराष्ट्राय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आज हैदराबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मणने ही घोषणा केली. लक्ष्मणने १३४ टेस्टमध्ये १७ सेंच्युरीज लगावल्या आहेत. १६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर क्रिकेटला अलविदा केला आहे. अनेक मॅचचा लक्ष्णन तारणहार ठरला. भारतासाठी सातत्याने खेळताना युवा खेळाडूंचा मार्ग रोखून धरल्याच्या टीकेमुळे निराश झालेला लक्ष्मण क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही मॅचेसमध्ये लक्ष्मणची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. त्यामुळे त्यानं टेस्टमधू निवृत्ती घ्यावी अशी त्याच्यावर टीका होत होती. यामुळे लक्ष्मण काहीसा दुखवला होता.
Source : Marathi Tv News