मनुष्य देह फक्त ईश्वर प्राप्तीसाठी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Use Your Spiritual Gifts for God’s Glory, Have you ever received a gift that you either didn’t like or had no use for? … hated his own body, but he feeds and cares for it, just as Christ does the church. … our conduct can speak volumes and honor God greatly—or, sadly.

                                  मनुष्य देह फक्त ईश्वर प्राप्तीसाठीच आहे!

mansache janma kashasathi zale?शास्त्रात मनुष्य शरीराची अतिसुंदर रचना केली आहे. या श्लोकातून म्हणतात

लब्धा सुदुर्लभतरं नरजन्म जंतू – स्तत्रापी पौरुषमत: सदसद्वीवेकम् || सम्प्राप्य चैहिकसुखाभिरतो यदि स्यांद् | धिक तस्य जन्म कुमते:पुरुष्याधमस्य ||

हा श्लोक फारच रहस्यमय असा अर्थपूर्ण आहे.
[मनुष्य शरीर अमुल्य आहे हाच त्याचा अर्थ निघतो]. या देहात ईश्वराने ईतकी प्रचंड अशी अद्भुत शक्ती दिली आहे, नित्य ची प्राप्ती करून अनित्य् चा त्याग करण्याची विवेक बुद्धी भरलेला असा हा दुलर्भ मनुष्य देह ईश्वराने आपल्याला दान दिलेला आहे. या श्लोकातून मानवी देहाचा सारांश प्रगट होतो. तो असा फार कष्टातून मिळणारी वस्तू म्हणजे दूर्लभ वस्तू त्यातही महत्वाच म्हणून ”सुदुर्लभतरं” हि संज्ञां आहे. नंतर ”नरजन्म” हा ईश्वराच्या देन मध्ये नर-नारी या दोन्हीत सारखीच विलक्षणता असली तरी दोन्ही मनुष्य देहच आहे, हे यतार्थ ! जन्तु म्हणजे जीव { श्लोकात जन्तु म्हटले आहे} सूक्ष्म शरीराच्या दृष्टीकोनातून बघितल्यास क्षुद्र किड्यांपासून तर मोठ्या प्राण्यांपर्यंत काहीच फरक नाही मानवी जीव त्यातच गणला जातो, तसेच स्थूल शरीराचा स्वभाव हि तोच असतो, शास्त्रात त्याला चार शब्दात गणतात, आहार, निद्रा, भय, मैथुन हाच स्वभाव दिलेला आहे. पण मानव जीव सूक्ष्म शरीराच्या स्वभावातून यथा योग्य असा मर्यादित उपयोग करीत नाही व स्थूल शरीराच्या स्वभावा नुसार अमर्याद असा दुर्व्यवहार चालू ठेवतो म्हणून त्याला जीव न म्हणता जन्तु शब्द दिल्या गेलेला आहे. तेव्हा परमेश्वराने मनुष्यास विवेक बुद्धी त्याकरीताच दिलेली आहे, सूक्ष्म शरीरातून [अंर्तमन] सदबुद्धी प्राप्त होत असते. ती नेहमी सुयोग्य मार्ग सुचवीत असते. त्यातच पुरुषार्थ आहे. बाकी प्राण्यात विवेक बुद्धी नसते. म्हणून प्रथम चरणात ‘नरजन्म’ व दुसर्या चरणात ”पौरुषमत:सदसद्वीवेकम” म्हटले आहे. दुसर्या कोणत्याही शरीरात पुरुषार्थाची सिद्धी होऊ शकत नाही. देव शरीर हि भोग शरीर आहेत पण फार विशेषण आहे येथल्या भोग पार्थिव आहेत व तेथील भोग म्हणजे दिव्य तेजपुंज अपेक्षा आहेत. दुसर्या प्राण्यात विवेक बुद्धी नसल्याने त्यांच्या कर्मा विषयी त्याना उत्तर दायित्व मानल्या जात नाही, परंतु मनुष्य प्राणी हा विवेक बुद्धी संपंन्न आहे त्यामुळे त्याला नित्य-अनित्य, विनाशी–अविनाशी, आत्मा–अनात्मा हे समजुनच नित्य कर्म केले पाहिजे, तरच मानव जन्म सार्थक होईल. मानवदेह मिळाल्या मुळे विषय-विलासात जीवन घालविणा र्यास ‘नराधम’ किंवा’ कुमती’ म्हटल्या जाते. * ईश्वराने अमुल्य असा नरदेह दान केल्या नंतर त्याचा दुरुपयोग करणे म्हणजे पुरुषार्थाचा धिक्कार म्हणावा लागेल. संपूर्ण नरदेह भोग संपत्ती संग्रह करण्यात जीवन घालविणार्या अशा ‘नराधम’ व ‘कुमती’ मानवास मनुष्य म्हणणेही योग्य नाही. तो पशु प्रमाणेच शुद्र मानल्या जातो. * म्हणून मनुष्य देहात आत्म ज्ञांनि होऊन, वेवेक बुद्धीचा सार्थ साधून अनित्य, विनाशी, अनात्माचा सर्वतोपरी त्याग करून नित्य, अविनाशी, आत्मतत्वता ग्रहण करण्यातच मानव देहाची सार्थकता आहे.

मनुष्य जन्म मिळाला तर उशीर न करता त्याचे ”आत्मकल्याण” करून टाकायला हवे. उशीर न करता या करीता म्हटले. बर्याच लोकांचे म्हणणे असते कि म्हातारपण आले कि भक्ती करू पण हे जीवन क्षण भंगुर आहे. याचा कधी नाश होईल हे सांगता येत नाही. मृत्यू कधी सूचना देऊन येत नसते. जेव्हा क्षण आला कि तो तुमचे मनोरथ पूर्ण झाले किवा नाही याची वाट देखील बघत नाही. तेव्हा चतुर मनुष्याची चतुराई, बुद्धीमत्ता यातच आहे कि लगेच सावध होउन या विनाशशील देहाचे सार्थक साधून अमृत स्वरूप अविनाशिला प्राप्त होणे. चौर्यांशी लक्ष योनी नंतर मनुष्य जन्म प्राप्त होण्यार्या या सुदुर्लभदेहा साठी कधी कधी देव सुद्धा आतुर होतात असे म्हटलेले आहे, याचे कारण असे कि या देहातच ”अर्थ” प्राप्ती होते आता अर्थ म्हणजे पैसा किंवा धन नव्हे, अर्थ प्राप्ती म्हणजे याचे विभाजन हे अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष पण मनुष्य जन्मात हे चारही प्राप्त करावयाचे असतात. याला ‘पुरुषार्थ चतुष्टय’ म्हटल्या जाते. पण तरी ‘अर्थ’ आणि ‘काम’ आपआपल्या प्रालबद्धा नुसार मिळत असते. पण ‘धर्म’ आणि ‘मोक्ष’ याच्या प्राप्ती साठी प्रयत्नशील असायला हवे. धर्माचरण सुसंगतीपुरुषार्थातूनच मोक्ष प्राप्ती होऊ शकते, कारण ‘धर्म’ मोक्ष प्राप्तीचे साधन आहे.

बाकी देह — विषयभोग ईन्द्रिय संयोगातून मिळणारे सुख सर्व योनीत सारखेच आहेत. किडे, पक्षी, पशु. प्राणी ईत्यादी, आता उदाहरणातून — भोजन म्हटले कि ‘षडरस’ भोजनातून मनुष्य प्राण्याला जी तृप्ती मिळते आणि इंद्रीय सुख, संतोष प्राप्त होतो. त्या खाद्यातून गाढव किंवा डुक्कर या शुद्र प्राण्याना सारखाच अनुभव होणार नाही. त्याला विष्ठेत तो अनुभव मिळेल. तसेच एका राजाला मखमली गादीवर झोपण्याचा जो अनुभव सुख प्राप्त होईल तो अनुभव गाढवाला राखडीच्या ढिगावरच मिळेल, हा फरक असतो. प्राणी आणि मानवात.

ईन्द्रीय सुख सर्व जन्मात सारखेच असतात. पण मनुष्य प्राण्यात समज, विचार, विवेक असतो. जसे मनुष्य प्राण्यास गाढव किंवा कुत्रा यांचे विषयभोग पाहिल्यास तूच्छ वाटतात. त्याच प्रमाणे ईन्द्रियाना मनुष्य भोगही तुच्छ प्रतीत होत असतात. स्वदृष्टीतून विषयभोग सारखेच वाटत असले तरी मनुष्य प्राण्यास विचार, विवेकबुद्धी असल्या कारणाने मृत्यूकडे पोचण्यापूर्वी नुसतेच विषय भोगात रममान होण्यापेक्षा प्रसंगावधान राहून आत्मत्त्वता साधने यात सार्थकता आहे. जो व्यक्ती मानव देह मिळूनही पक्षान प्रमाणे घर-संसार या मध्येच आसक्त असतो, त्याला स्वर्गीय ऋषिगण नरकातील किडा असे संबोधतात.

मानवदेह म्हणजे ”मोक्षद्वारमपा वृत्तम” खुल्या दरवाज्याचा मोक्ष मंदिर म्हटलेले आहे. त्यात फक्त प्रवेश करण्याची सद्बुद्धी प्राप्त व्हावयास हवी. पण आपण हे सर्व सोडून घर-संसार-विषयसुख, भौतिकव्यवहार, भोगसंपत्ती संग्रह करण्यात आयुष्य घालवीत बसलो. तर मोक्ष मंदिराचे सुवर्ण द्वार प्रवेश करण्यास वेळ गमावून बसलेलो असणार. हि आसक्ती आपल्याला नरक द्वारा कडेच नेणार. तेव्हा या मानव देहातील अमुल्य जीवनास व्यर्थ न करता मोक्ष साधनेत लागून मनुष्य जन्म सार्थकी लावायलाच पाहिजे. या अमुल्य अवसराला न गमवता बाजी जिंकलीच पाहिजे. नाहीतर अंतत:जिती बाजी हार गयी अशी अवस्था झाल्या शिवाय राहणार नाही.

Source : Marathi Unlimited Articles.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu