कारमध्ये बसून वार्याच्या वेगानं उडण्याचं स्वप्न कधी पाहिलंय? नाही ना! मग आता पाहा.. कारण, अशी कार आता प्रत्यक्षात आली आहे. अमेरिकेच्या एका विमान कंपनीने रस्त्यावर धावता धावता २0 सेकंदांत हवेत झेपावणारी कार तयार केली आहे. ट्रांझिशन असे या कारचे नाव असून, या कारचा परवाना रस्त्यावर धावणार्या कारसारखाच दिला जातो. पार्किंग सर्वसाधरण कारच्या गॅरेजमध्ये पार्क केली जाऊ शकते. कारसारखी चार चाके पंख पोटात रस्त्यावर चालवताना या कारचे पंख पोटात असतात. उड्डाण घेताना हे पंख ८ मीटर दूर पसरतात.
Source : Marathi News.