श्रीकृष्णाची आराधिका….तीच हि राधिका!
कृष्ण या नाव सोबत श्री हा उच्चार म्हणजे… श्रिया सहित: कृष्ण:= श्रीकृष्ण: श्रि रूप म्हणजेच ”राधा ” वृंदावनातील परम सहायिका, योगमाया, आल्हादिनी शक्ति, हीच व्याख्यायीका ”राधा’ ‘करीता आहे. श्रिराधा चा परिचय म्हणजे ”राधा आणि ब्रम्हवैवर्तपुराणात” या पुराणांत ब्रम्हाजींनी स्वत: मंत्रोच्च्यार करून ‘राधा कृष्णाचा विवाह’ संपंन्न केल्याचा उल्लेख दिला आहे. * भगवान श्रीकृष्णांनी राधाच्या समर्पित प्रेमाची आख्यायिका स्वयं उल्लेखिली आहे. एकदा स्वत: आजारपणाच्या बहाण्याने त्यांनी देवर्षी नारदांना बोलावून घेतले, सर्व वैद्य उपचार निष्फळ झाल्याने ते म्हणाले माझा आजार सामान्य औषधिंचा नसून माझ्या समर्पित प्रेमीभक्तांच्या चरणधुळीच्या स्पर्शाने ठीक होणारा आहे. तेव्हा तुम्ही तुरंत चरणधुळी आणावी, नारदांनी विचार केला कि यांचे स्नेहीजन फक्त वृन्दावनातच मिळतील, देवर्षी नारद लगेच वृंदावणी पोहोचले, आणि गोप-गोपींना त्यांचा आजारपणाच निरोप सांगितला; पण कोणीच आपली चरणधुली देण्यास तयार नव्हते,गोपिका म्हणाल्या कि आम्ही आपली चरण धुळी भगवंताना देवून पापाचे भागीदार होवून नरकयातना कश्या काय भोगाव्यात! एवढे महा भयंकर पाप कसे करणार? नंतर देवर्षी नारद ”श्रिराधे” कडे गेले, तेव्हा राधाने तत्काळ आपल्या चरणाची धुळी देण्यास तयार झाली व म्हणाली ‘हे देवर्षी माझ्या प्रियकराला जर माझ्या चरण धुळीने सुख प्राप्त होत असेल. तर मी एक वेळ नाही अनंत वेळी घुळी देवू शकते! नंतर मला जन्म जन्मांतर कठोरनरक यातना भोगाव्या लागल्या तरी मी भोगावयास तयार आहे; त्यावरून राधाचे श्रीकृष्णा विषयीचे भक्तिप्रेम लक्षात धेण्या सारखे आहे.
Source : Marathi Unlimited.