जुलैला श्रावण कृष्ण पक्ष अष्टमिला मथुरेला झाला होता. ”कृष्णस्तु भगवान स्वयंम” याचा अर्थ श्रीकृष्ण स्वत:च भगवान आहेत. त्यांनी सुद्धा ”मामेकं शरणं व्रज” असे म्हटलेले आहे. मीच पूर्ण परमात्मा असून मलाच शरण यावे. असे स्पष्टपणे त्यांनी म्हटलेले आहे आणि हे खरे आहे. संतांनी भगवंन्तांची जी लक्षणे सांगितलेली आहे ती त्यांच्यात परीपूर्ण आहेत.श्रीहरी आदर्श, तत्वज्ञांनीं, मार्गदर्शक, योद्धा, धर्मसंस्थापक, योगेश्वर, कर्मयोगी, मित्र, पिताबंधु, राजा, शिष्य, पती, संगीतज्ञ, मुलगा, भक्तीवान तरीही वैरागी आहे. संत श्रीहरी विषयी काय म्हणतात ते बधा, ”सर्वांगाने भोगी जीवन, तरीही ज्यांच्या अंगी विरक्ती पूर्ण, तो जाना रुक्मिणीवर, पूर्ण पुरुष हा, ”जगात पूर्ण पुरुष श्री कृष्णच आहेत, असे संत मीराबाई म्हणायच्या. श्रीकृष्णाला सोळा कलांचा अवतार मानतात. श्री मुरलीधराच्या भक्तीत आनंद भरलेला आहे. मनुष्याचा खरा धर्म कोणता ते त्यांच्या भगवत- गीतेतून समजते आहे, समाजाची जो धारणा करतो तो धर्म होय, भारतीय संसकृती मध्ये गोविंद, गीता, गायत्री, गाय आणि गंगा यांना अतिशय महत्व आहे. संपूर्ण ब्रम्हांड माझ्यातच सामाविले असूनही मी अष्टांगुळे उरला आहे. हे श्री गोविंदाने यशोदामाता,अर्जुन, संजय वैगरेंना प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.
जगत कर्म भूमी असल्यामुळे प्रत्येकाने सत्कर्मे निष्काम भावाने करावीत, पण फळाची अपेक्षा करू नये. हेच गीतेत सांगितले आहे. शांत चित्ताने विचार केल्यास या श्रीगोपाळाच्या संवेदना मध्ये फार मोठे अध्यात्मिक सार आहे, श्रीकृष्णाची व्याख्याच अशी आहे कि ”आकर्षण करोति ईति कृष्ण: ”कुंजविहारीच्या सावळ्या रूपावर सर्व संत मंडळी, गोप, गोपिका व सर्व प्रकारचे प्राणी अतिशय खुश आहेत, त्यांच्या सावळ्या आकर्षक रूपावरअनेक श्लोक, अभंग गीते, भजने संतांनी केलेली आहे. त्याच्याबाबत गोपी काय म्हणतात बघू– ”सहज उभी होते अंगणी, अवचीत्त कृष्ण देखियला, नयनी | तेणे पिसे लागले गं सजनी, काय करू मी आतां? महानुभावपंथा मध्ये श्री गोविंदाचे वर्णन अप्रतिम रीत्या रेखाटलेले आहेत. श्रीकृष्ण कसा दिसतो? तर– चांपेकौर कांती, चापाच्या वृत्ती | चांपोलीसाजती:चक्रपाणी|| रुखवंत देऊन आलेल्या विद्याधारीनींना रुख्मीनीने विचारले होते कि, श्रीकृष्ण तुम्हाला कसा दिसला गं? तेव्हा त्या म्हणाल्या, सर्वांगी न देखे तुमचा कांतु | देखिले ते अंग तेथून, ढळतीच न लोचन|| याचा अर्थ असा कि तुमच्या पतीला आम्ही पूर्णपणे पाहिलेच नाही, परंतु त्यांचे जे अंग पाहण्यात आले, तेथून आमचे लोचन दूर व्हावयास तयार नव्हते, काहींनी श्री कुंजविहारीला माडीवरुनच पहिले त्यांची अशी अवस्था झाली, बघा, कैसी संभ्रमित झाली | माडी वरुनिया घालू पाहे उडी खाली|| या वरून कृष्ण स्वरूपाचे किती आकर्षण होते? हे दिसून येते. संत म्हणतात, सावळे ते सगुण | जीवनाचे जीवन||
श्रीकृष्णाचे दुसरे नाव म्हणजे वासुदेव होय, ”वास: करोति ईति वासुदेव:” संपूर्ण जगात व प्रत्येकाच्या हृदयात श्री कृष्णाचाच वास असतो, त्यांचे एक नाव मदनमोहन असेही आहे, त्याचा अर्थ असा कि- ज्याला मद नाही मोह नाही असा तो मदनमोहन. त्यांच्या बालपणाच्या खोड्या म्हणजे एक स्वतंत्र विषयच आहे, ईतके मोठे मोठे त्यांच्यात सदगुण असूनही ते अतिशय नम्र आहेत. त्यांनी आपले गुरु सांदिपनी ऋषी व मित्र सुदामा यांची अतिशय अंत: कर्णाने सेवा केली होती, भक्तवत्सल देवता म्हणून त्यांचा मान आहे. म्हणतात, चौदा भुवने जयाचिया पोटी, तो राहे भक्तांचिया कंठी , त्यांनी अर्जुनाचे घोडे धुतलेत, जनाबाईचि लुगडी धुतलीत, बाळंतपने सुद्धा केलीत म्हणतात. पुत्र नामयाची झाला, विठू बाळंतपणाशी आला श्री विठ्ठल आणि श्री कृष्ण हे एकच होय. श्री कृष्ण भक्तीत परमोच्च आनंद आहे.
कम्युनिस्ट रशियातील मास्कोत दहा हजार कृष्ण भक्त आहेत,तसेच भरपूर कृष्ण भक्त परदेशातही विखुरलेले आहेत. गर्ग ऋषी म्हणतात, जो श्रीकृष्णाचे अंत:करनातून नामस्मरण करतो,त्याचा कधीच पराभव होऊ शकत नाही, कारण— संतांच्या जे जे मनी ते ते पूर्वी चक्रपाणी, मात्र प्रेमभक्ती अंत:करणातून केली पाहिजे. तसेच श्री राधेचे स्मरण व तिला वंदन केल्याशिवाय श्रीकृष्ण भक्ती परिपूर्ण होवू शकत नाही, कर्म राधा हा शब्द उलटा केला कि धारा हा शब्द तयार होतो, याचा अर्थच मुळी प्रेमाची ” धारा” म्हणजेच” राधा” होय.भक्ती प्रेमाची परमोच्च अवस्था म्हणजेच ” राधा ”…श्री कृष्ण हा गवळ्यानचाच पुत्र नसून ”पूर्णब्रम्ह ” आहे. हे श्रीकृष्णाच्या काळी फार कमी जणांना माहित होते त्यात राधाही एक होती, ह्या गीतातून लक्षात येते कि सुरेश, दिनेश, गणेश, महेश, ध्यान धरे | परपार न पावे|| अश्या या जगदिश्वराला ” राधा ” एक वाटीभर टाक देवून नाचवीत असे यावरून राधेची परमोच्च अवस्था कशी होती ती काय होती, हे लक्षात येते. भक्ती रसाची माधुरी,जैसी अमृताची शिदोरी. न राधिका समान नारी, न कृष्ण समान पुत्रान “श्री कृष्णाला प्राप्त करून ध्यायचे असेल तर राधेची प्रसंन्न्ता अति आवश्यक आहे.” राधा राधा जपेंगे तो आयेंगे बिहारी असे म्हणतात.
Source : Marathi Unlimited.
Read More About Shri Krishna Radha Prem Kahani.