भारताच्या सायना नेहवालने झंझावाती खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री सव्वा आठ वाजता संपलेल्या या सामन्यात सायनाने डेन्मार्कच्या टिना बाऊन हिचा २१-१५, २२-२० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट सायनाने १६ मिनिटांत जिंकला तर दुसरा गेम २१ मिनिटांत आपल्या ताब्यात घेतला.
Source : Marathi Unlimited.