सायना नेहवाल उपांत्य फेरीत पराभूत
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Saina Nehwal loses to China's Wang Yihan in semi-final

सायना नेहवाल उपांत्य फेरीत जागतिक पातळीवरील क्रमांक एकची चीनची खेळाडू यिहान वांग हिच्याकडून सरळ दोन सेटमध्ये पराभूत झाली. वँगने सायनाला २१-१३ व २१-१३ अशा सरळ सेटमध्ये सहज हरविले. सायनाने पहिला सेट १३-२१ ने गमविल्यानंतर दुस-या सेटमध्ये तिने वांगला झुंजवले. दुस-या सेटमध्ये १२-१२ अशी बरोबरी होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात सायनाला ती लय राखता आली नाही. वँगच्या सर्विसपुढे सायना वारंवार चुका करीत होती. त्यामुळे वँगला एक-एक गुण बहाल होत होता. दुसरीकडे, सायनाचा गुणफलक मात्र तसाच होता. अखेर वांगने दुसरा सेटही २१-१३ असा सहज जिंकत सामना खिशात घातला. याचबरोबर चीनने आपल्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक निश्चित केले.

Source : Marathi News.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu