हवालदार देणार कसाबला फाशी?
Like
Like Love Haha Wow Sad Angry

kasab gets death penalty

हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले असले तरी त्याला फाशी द्यायला जल्लादच नाही. त्यामुळे हे काम पोलिस दलातील एखाद्या हवालदाराला सोपविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नाही. कसाब आणि त्याच्या नऊ सहका-यांनी २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री मुंबईत दहशतवादी हल्ला केला होता. अंदाधुंद गोळीबार करत कसाबने अनेकांचे जीव घेतले होते. सध्या कसाब आर्थर रोड तुरुंगात असून त्याच्या सुरक्षेवर कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. काल कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे कसाबच्या शिक्षेची लवकर अमलबजावणी व्हावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. कसाबच्या फाशीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली तर त्याला फाशी एक हवालदार देऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.

Source : Marathi Updates.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu