देशाचा राष्ट्रध्वज परिधान करुन फोटोशूट करणा-या गेहना वशिष्ठविरोधात लोकजनशक्ती पक्षाच्या रवींद्र ब्रम्हे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पुण्याच्या डेक्कन पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री तिला मुंबईतून ताब्यात घेतलं. गेहनाला न्यायालयात हजर केलं असता तिची पाच हजारांच्या जामिनावार मुक्तता करण्यात आली. या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं तक्रारकर्ते ब्रम्हे यांनी सांगितलं. प्रसिद्धीसाठी अनेक मॉडेल कोणताही मार्ग अवलंबताना दिसतात. परंतु गेहन वशिष्ठनं सर्वांवर कडी करत चक्क तिरंग्याचाच अपमान केला. त्यामुळं तिला संतप्त जमावाकडून मारहाणही झाली होती.
Source : New Channel