मायक्रोसॉफ्टने आपला बोधचिन्ह तब्बल २५ वर्षांनी बदलले आहे. नवा लोगो त्यांनी शुक्रवारी प्रसिद्ध केला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ही कंपनी लवकरच आपली काही नवी उत्पादने बाजारात आणणार आहे. त्याचाच भाग म्हणून लोगोत बदल करण्यात आला. नव्या लोगोत चार वेगवेगळ्या रंगांचे चार वेगवेगळे चौकोन आहेत. मायक्रोसॉफ्टची विंडोज-८ ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम आणि नवा टॅब्लेट कॉम्प्युटर सरफेस बाजारात आणत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टने अधिक आक्रमक होत काही बदल केले आहेत.
Source : IT Articles.