Love Story of Lord Sri Krishna & Radha has been perceived differently by different people down the ages. She is sometimes the adulterous and amorous lover of Krishna
एकदा सुर्यउपासनेकरीता सगळे वृंदावनवासी गोप-गोपिका व ‘राधा’ कुरुक्षेत्रात आले, तेव्हाच द्वारकेहून संपूर्ण द्वारकावासी व श्रीकृष्ण भगवान आपल्या राण्यांसोबत कुरुक्षेत्रात आले होते. रुक्मीणीला माहिती पडले कि माझ्या पतीची सहचारिणी राधासुद्धा येथे आलेली आहे. तेव्हा राधाला त्यांनी स्वत:च्या महालात अतिथी म्हणून बोलावले, आदरातिथ्य करून त्यांच्या सेवेची जबाबदारी स्वत: स्वीकारली. रुक्मिणी सायंकाळी दररोज स्वत: राधाला दुध द्यायच्या.
एक दिवस विश्रामानंतर रुक्मिणी श्रीकृष्णाचे चरण चेपत असताना त्यांना भगवंताच्या चरणकमलांवर जखमा दिसल्या. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी भगवंताना वारंवार विचारणा केली. शेवटी भगवंतांनी जे उत्तर दिले तेही त्यांना आश्चर्यजनक वाटले; “आज कदाचित तुम्ही राधाला अधिकच गरम दुध पाजलेले दिसते, म्हणून ह्या जखमा झाल्यात”.
त्यांना काही समजेनासे झाले, “राधाच्या दुध पिण्याचा व तुमच्या चरणांचा काय संबंध ? आपण काहीतरीच सांगत आहात!”
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ‘राधाच्या’ हृदयातच माझे चरण विराजमान असतात; त्यामुळे तुम्ही त्याना गरम दुध पाजले म्हणून माझे चरण भाजलेत!”
यावरून लक्षात घेण्याजोगे आहे कि राधाचे निश्चल, निश्छ्ल, निस्वार्थ, सर्वस्व समर्पित भावना असलेले जीवन होते. म्हणूनच म्हणतात राधा जप केल्याशिवाय श्रीकृष्णाची भक्ती अधुरीच असते.
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
Source : Marathi Unlimited
1 Comment. Leave new
good one.