लहान पण देगा देवा




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1405111

Lahan Pan Dega Deva of his ‘Durvanchi Judi’ with the plays produced under the same banner. ‘Denaryache Haath Hazaar’ and ‘Lahanpan Dega Deva!’

                                         चिंतन: लहान पण देगा देवा.. हे महान अनमोल शब्द!

lahanpan dega deva मान आणि तारीफ हि मनुष्याची सर्व प्रथम भूक होय, आजच्या  काळात प्रत्येक मनुष्याच्या मनात अशी ईछा आहे. मला महान  मानावे, माझी प्रसंसा व्हावी,माझ्या गुणाचे गुणगान व्हावे, स्वत:ला  कमी मानायला कोणीच तयार नाही. पण सत्य काय! ”लहानपणातच  महांनता आहे” हे कुणीही समजलेले नाही.एक साधारण दिसणारे ‘  ‘बी” जमिनीत रुजून त्याचे मोठे वृक्ष बनते. तेव्हा त्याला संपूर्ण नष्ट  व्हावे लागते, नंतरच मोठे वृक्ष बनून त्याला महानता प्राप्त होते.  परंतु मनुष्याची कमजोरी यातच आहे कि त्याला त्याच्या  कामगिरीचा लवकरच अहंकार होतो. त्याला त्याचे क्रेडीट पाहिजे  असते. मनुष्यास वाटते कि मी कुणा समोर झुकलो किवा लहानपण  पत्करले तर मला कमजोर समजून माझी उपेक्षा करतील, पण हि  वास्तविकता नाही. ”ज्ञांनी पुरुष्यांचे म्हणणे असे कि: काम मोठे  करूनही लहानपण पत्करणेवाला व्यक्ती महान व बलवत्तर मानल्या जातो. उदाहरणार्थ म्हणजे वृक्षाची फळांनी भरलेली फांदी कधीही झुकलेली असते. त्याचे महत्व व किंमत हि अधिक असते.तिच्या कडे लोक आतुरतेने बघतात. बाकी फांध्यान कडे कुणाचे लक्ष हि जात नाही. व त्यांची किंमत कोणी करतही नाही. हे खरे आहे.पण अहंकारी मनुष्याचे तसे नसते, तो बर्याच वेळा कृत्रिम महानता व अकड आणून दुसर्याचे लक्ष आपल्या कडे वेधण्याचे प्रयत्न करीत असतो हि त्याची कमजोरी असते. हा त्याचा अहंपणाचा स्वभाव आणि निष्फळ व्यवहार त्याला अपयशाच्या मार्गाला नेते. त्याला महानता प्राप्त होऊ शकत नाही. ज्याला यश पाहिजे असेल तर नम्रता व सहनशीलता स्वभाव असायला हवा. तो यशाचे शिखर गाठू शकतो उदां: म्हणजे अहंकारी दुर्योधन राज कुमार, शक्तिशाली असूनही त्याला हार पत्करावी लागली व महानता प्राप्त होऊ शकली नाही. आणि धर्मराज युधिष्ठीर हे सन्मानास प्राप्त होवून त्यांना उच्चतम स्वर्ग लोक प्राप्त झाले. असे म्हणतात. हे त्यांच्या नम्र स्वभावाचे धर्म पालनाचे प्रतिक होय. * कधी कधी मनुष्य आपली महानता दर्शविण्याकरीता कृत्रिम नम्रपणाचे भाव आणतात. काहीवेळ ईमानदारी दर्शवितात. पण ते नाटक जास्त काळ टिकू शकत नाही. कधी तरी त्यांच्याच क्रोध, लोभ, द्वेष, राग, उन्मत स्वभावातून त्यांच्या असली स्वभावाचा व्यवहाराचा त्यांच्या आस्क्तीतुनच अचानक प्रगट होतो उदाहरणार्थ:- पाळलेली मांजर कितीही शाकाहारी असेल, दुध पिणारी असेल, नम्र असेल तरी एखादे वेळी तिला उंदीर दिसताच ती आपले हिंसक रूप धारण करून त्या उंदरावर झाप टाकते. व आपल्या असली हिंसक रूपाचे प्रदर्शन करतेच.

महान अश्या संतांचे म्हणणे आहे कि लहान मोठ्यांना मान प्रदान करून स्वत: लहानपण पत्करणाऱ्या व्यक्तीतच देव बघावा, दुसर्याला नीच व कमजोर दर्शवून जो स्वत; महान बनण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती कधीच महान बनू शकत नाही. जो कोणी दुसर्याला महान समजतात तेच महान असतात. पण आजचा मनुष्य हे कटूसत्य मानायला तयार नाही. सृष्टीद्वारे प्रभू ने कितीतरी प्रकारे आपल्याला विभूषित केलेले आहे. कुणी धनवान, कुणी बुद्धिवान, कोणी सुंदर, तर कुणी शक्तिवान, कोणाजवळ मोठे पद, आणि कोणाच्या घरी तर रिद्धी सिद्धी नांदतात. पण या सर्व गोष्टींचा मनुष्याला अहंकार झालेला आहे. त्यांना पैसा,पद, पांडित्य, प्रतिष्ठा त्यांच्या जवळ असून सांभाळता येत नाही. सामर्थ्य असूनही ते पचवू शकत नाही. कारण हे कि त्यांच्या जवळ विनम्रता नाही अहंभावाने जे उन्मत्त झालेले आहेत. आणि हे कित्येक काळा पासून चालत आहे. उदाहरणार्थ: रावण, हिरण्यकश्प, औरंगजेब, सिकंदर, चंगेज खान, कंस असे कित्येक नावे ईतिहासात आहेत आणि आजच्या यादीतील म्हणजे ओसामा बिन लादेन, सद्दाम हुसैन हे सुद्धा आहेत. यांना यांच्या अहंकाराने व अभिमानाने यांना हार पत्करावी लागली. यांच्या अश्या उन्मत्त स्वभावाला विश्वजनता विसरू शकत नाही.आणि विनम्रता स्वभावाचे उदाहरण द्यायचे म्हणजे:-
बादशहा अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न म्हणजे कविराज अब्दुल रहीम खानखाना हे दरबारातील मंत्री पदावर होते ईतके उच्चपद प्राप्त होवूनही समाधानी व साधेपणाचे जीवन जगत असेत. आपल्या मिळकतीचा अधीकांश पैसा ते दान पुण्य व धार्मिक कार्यात व्यस्त करीत. पण त्याचा तिळभर सुद्धा अभिमान ते करीत नसत. तरी त्यांची नजर नेहमी झुकलेली असायची व त्यांचा विनम्र स्वभावाने त्याना असे उच्च पद प्राप्त झाले होते, तेव्हा काही जन लोकांनी त्याना विचारणा केली कि आपण ईतके दानी आहात तरी नेहमी तुमची नजर अशी झुकलेली का असते? त्यावर त्या विनम्र स्वभा वाच्या या व्यक्तीने उत्तर दिले कि ”देणे वाला कोई और हैं जो दिन रात देता रहता हैं पर लोग मुझपर भरम करते हैं; ईस लिये शर्म से और संकोच से मेरी नजरे निची हो जाती हैं ; याला लहानपण म्हटल्या गेलेले आहे. त्याच्या या नम्र व सात्विक अश्या स्वभावातून त्यांचे लहान पण दिसून येते, हि व्यक्ती महान व अमर झाली आहे.

असे म्हटल्या जाते कि एक वेळ माता सीता ला प्रश्न पडले कि भक्त हनुमान वानर असूनही ईतके बलशाली का? कि रामरायांना त्यांची मदत घ्यावी लागली, आणि त्यांनी हनुमानजींना विचारले देखील कि तूमच्यात ईतके सामर्थ्य कसे काय आहे? समुद्र पार करणे, द्रोणागिरी पर्वत उचलणे, एवढी मोठी लंका तहस महस करणे. तेव्हा हनुमानजी ना प्रथम वाटले ‘माता’ माझे कौतुक करीत आहे कि, परीक्षा बघत आहे? मग त्यांनी सांगीतले कि माता मी या सर्व गोष्टीचा पात्र कसा काय राहणार माझी रामभ्क्तीतच माझी शक्ती आहे. याचे श्रेय मला नाही माझ्या प्रभूंना मिळायला हवे.सर्व कार्य स्वत:करूनही त्यात त्यांचा किती मोठेपणा म्हणावा लागेल कि त्यांनी लहान पण पत्करले. दुसरे उदाहरण म्हणजे एकदा भगवान बौद्धदेव यांना त्यांचा चेला विचारतो कि देवा आपण उच्च स्थानावर बसून श्रोते खाली बसून ज्ञान घेतात हे कितपत योग्य आहे. तेव्हा बुद्धंदेवांनी म्हटले कि तू कघी झरण्याचे पाणी पिले आहे काय, तो होय म्हणाला: पहाडी वर उभे राहून वाहत्या नदीचे पाणी पिण्याची ईछा प्रगट केल्याने तहान भागणार नाही, त्यासाठी खाली उतरूनहि प्रथम झुकावे लागेल. तेव्हाच पाणी मिळेल व तहान भागेल. तसेच हे तात्पर्य आहे कि खाली बसून किंवा लहानपण घेऊन कोणतीही वस्तू किंवा ज्ञान प्राप्त होते.ज्या व्यक्तीने विनम्रतेचा पाठ समजून घेतला तो विशाल सागरा प्रमाणे सर्व गोष्टी सामावणारा असतो, उच्च पद प्राप्त करण्या करीता मनुष्याला सदैव विनम्र व लहानपण घ्यावे लागते.

Source : Marathi Articles

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1405111




, , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu