कल्याणमयी शिव….
जीवनात आपल्याला जे काहीम्हणजे एश्वर्य, माधुर्य, सौंदर्य, शक्ती, शौर्य, सुख, तेज, संपत्ती, स्नेह, प्रेम, अनुराग, भक्ती, ज्ञान, विज्ञान, रस, तत्व, गुण, महात्म्य, श्री हे सर्व मिळत आहे. हे त्या भंडार मधून मिळत आहे. अनंत काळा पासून जिथे हा भंडार आहे आणि राहील. हे सर्व मिळत असताना तेथे तो तिळमात्र सुद्धा खाली झालेला नाही.तो सदाही अनंत, असीम भरलेला असतो.तो कोठे आहे? हे जर का महित असते तर आम्ही अश्या तूछ व क्षुद्र वस्तूंच्या मागे पडलो नसतो, तो भंडार जाणण्याची कोशिश कधी केलीच नाही, त्या तत्वाच ज्ञान थोड जरी प्राप्त झालं. तर त्याच्या वरील चित्त हटत नाही जीवनात ओतप्रोत सौंदर्य, माधुर्य भरून येते. भगवान शिव सतचितानंद, परम पवित्र, देवाधीदेव सर्वव्यापी आहेत हा संसार त्यांचाच पसारा आहे. आपण सारे त्यांचीच संतान आहोत, ते सतत झोपता जागता, खातापिता, आपल्या सोबतच असतात. त्याना ओळखले पाहिजे, त्यांच्या चिंतनात आत्म्याला परम शांती मिळून दु:खपार होते, जगातल्या कोणत्याही गोष्ठींचे भय उरत नाही, निर्भय, निरामय असे जीवन होऊन अंतिम मृत्यूचे भय उरत नाही. या साठी परम श्रध्येची आवश्यकता आहे. अनुभवी महात्मानी त्याना जाणले ते ज्योती स्वरूप, ज्योतिकण, ज्योतीर्बिंदू आहे भगवान प्रकाशमय आहे. दिव्य असा आनंद जीवनात आल्या शिवाय राहत नाही. त्या कल्याणमयी आदी-अनादी, जन्म-ते- मृत्यू आणि त्याही नंतर तोच म्हणजे ”शिव” आहे, त्याच्या शिवाय काहीच उरत नाही म्हणूनच म्हटलेले आहे कि ” शिवाय नम:”
जीवनातील कुठल्याही आनंदाशी त्या कल्याणमय शिवाच्या आनंदाशी तुलना होऊ शकत नाही,अत्यंत विलक्षण ज्योतीस्वरूपाची परमभक्ती करून त्या आनंदचे भागीदार बनून जां…..
Source : Marathi Unlimited.