भारतीय `यंगिस्तान`ची हॅट्रीक. ऑस्ट्रेलियाचा चक्काचूर!
भारतानं ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सने पराभूत करत ‘अंडर-१९ वर्ल्डकप’चं अजिंक्यपद पटकावलं. कॅप्टन उन्मुक्त चंदच्या १११ रन्सच्या जोरावर भारतानं वर्ल्डकप विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या विजयासह भारतानं तिसऱ्यांदा वर्ल्डकप विजेतेपद पटकावण्याची किमया साधली. याआधी भारतानं २००० आणि २००८ मध्ये वर्ल्डकप विजेतेपद पटकावलं होतं. भारताचा कॅप्टन उन्मुक्त चंद यानं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर बॅटींगसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं भारतीय टीमसमोर २२६ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून संदीप शर्मानं सर्वाधिक चार विकेट्स घेत कांगारु बॅट्समनना रोखून धरलं होतं.
Source : News TV.