पुण्यात चार स्फोट झाल्यानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही अलर्ट जारी केला गेला आहे. पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास पाच ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . गरवारे कॉलेज, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला आहे. आर डेक्कन मॉलजवळ पाचवा स्फोट झाला आहे.पुण्यात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुण्यात येणार होते आणि त्याच वेळी पुण्यात स्फोट होत आहेत हा काही योगायोग वाटत नाही.
Source : Online News Updates