टीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे. टीम अण्णा नावाची कोणतीही कमिटी नसणार आहे. त्यांच्या नावे काहीह कार्यभार होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र राजकीय पक्षासाठी नवीन कोअर कमिटीची स्थापना आजच करण्यात येणार आहे. अण्णा म्हणाले की, मी कोणत्याही नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार नाही.
Source : Marathi News TV