`एक था टायगर` हा सिनेमा कमाईचे नवनवे रेकॉर्ड करतोच आहे.सिनेमा रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण झाले नसले तरीही या सिनेमाने २०० कोटींची कमाई केली आहे. १५ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी ३२ कोटींचा गल्ला जमवला. पाच दिवसात १०० कोटी रुपये या सिनेमाने कमाई केली आणि इतक्या कमी दिवसात १००कोटी कमावणारा हा एकमेव सिनेमा ठरला. आत्तापर्यत भारतात या सिनेमाने १७५ कोटींची कमाई केली असून जर परदेशातल्याही कमाईचा विचार केला तर आत्तापर्यत एक था टायगर सिनेमाने २१० कोटींचा गल्ला जमवला आहे.
Source : Online News.