देशभरात गॅस सिलिंडरचे लाखो ग्राहक आहेत. परंतु कित्येक ठिकाणी एकाच घरी तीन ते चार गॅस कनेक्शन आहे. काही ठिकाणी या गॅस कनेक्शनची नोंद कागदोपत्री असून प्रत्यक्षात त्यावरील सिलिंडरचा वापर नियमबाह्य कामांसाठी केला जातो. घरगुती वापराचे हे सिलिंडर उद्योग- व्यवसायात किंवा वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरले जातात. घरगुती सिलिंडरवर केंद्र सरकारकडून सबसिडी दिली जाते. मात्र घरगुतीच्या नावाखाली निघणारे ही सिलिंडर हॉटेल व्यवसायात सर्रास वापरले जाते. त्यामुळे केंद्राच्या सबसिडीचा फायदा घरगुती ग्राहकांऐवजी व्यावसायिक उचलत आहेत. एक घर एक गॅस कनेक्शन मोहिमेची अंमलबजावणी करताना सर्व गॅस एजंसीजना आपल्या ग्राहकांचे पत्ते अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एकाच पत्यावर अनेक गॅस कनेक्शन दिसल्यास ते जप्त होतील. अशा सूचना आहेत.
Source : Online Updates