गेल्या एका महिन्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 14 कोटी 50 लाखांचं ड्रग्ज जप्त केलंय. मुंबई क्राइम ब्रांचच्या एएनसी विभागाने महिन्याभरात संपूर्ण मुंबईत टाकलेल्या छाप्यात कोकेन, चरस, एम्फेटामाईन, हिरोईन, गांजा जप्त केलाय. एकूण 117 किलो वेगवेगळे ड्रग्स पोलिसांनी जप्त केलंय. ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एकूण 28 आरोपींना अटक केलीय. तर ड्रग्ससेवन केल्या प्रकरणी तब्बल 408 जणांना अटक केलीयं. अटक करण्यात आलेल्या नाजेरियन नागरिकांकडून एका नव्या मोडस ऑपरेंडीचा खुलासा झालाय. ड्रग्स विकणारे नायजेरियन ‘स्टुडंट व्हिजा’वर भारतात येतात आणि इथल्या महिलांना प्रेमाचा जाळ्यात अडकवून त्यांचाशी लग्न करतात. इथेच स्थायिक झाल्यावर मुलीच्या घराचा वापर ते ड्रग्स विकण्यासाठी करतात.
Source : Marathi Unlimited.