Bhagwan Mahavir, also known as Vardhamana, was the twenty-fourth and last tirthankara of Jainism. He was born into a royal family in what is now Bihar
१) भगवान महावीर हे जैनांचे २४ वे तीर्थकर, [गुरु]. भगवान महाविरांनी जो उपदेश केला आहे. तो फक्त जैनांसाठीच आहे असे समजण्याचे काही कारण नाही. त्यांनी केलेला उपदेश सर्व मानव जातीसाठी आहे. तो सर्वकालीकहि आहे. जिभेचा उपयोग काय? तर आपण म्हणू बोलण्यासाठी… चव घेण्यासाठी. पण महावीरांनी जिभेचा खरा उपयोग काय ते सांगीतले आहे. ते म्हणतात आत्मनिंदा आणि दुसर्यांच्या प्रशंसेसाठी जिभेचा उपयोग करणे गरजेच आहे. दुसर्यांच्या गुणाची स्तुती केली तर कालांतराने ते गुण आपल्या मध्ये समक्रमित होतात. पण जर दुसर्याची आपण निंदा नालस्तीच करत राहिलो तर ते अवगुण आपला ताबा घेतात. म्हणून काय करायचं ते आपण ठरवायचं. तुम्ही जे देता तेचं तुम्हाला मिळतं, हाचं न्याय या ठिकाणी आहे. प्रत्येक माणूस हा गुनदोषांनी भरलेला आहे.मग आपण दुसर्याचे दोषच कां बघायचे? आपण चांगल्या गोष्ठीन कडे लक्ष द्याव. दुसर्याचे दोष काढल्यामुळ त्या माणसाच्या मनात यातना तर होतातच अन आपलही मन दुषित होतं.
२) घमेंड, अहंकार याबद्दल उपदेश करताना ते म्हणतात कि अभिमान हे दोन महा भयंकर शैताण आहेत. हे दोन माणसातले सर्व चांगले गुण खाऊन टाकतात; गुणी माणसाच अक्षरश:वाटोळ करून त्याला पतनाकडं घेऊन जातात. राम भक्त हनुमानच उदा. याबाबत फार बोलकं आहे. हनुमानाकड काय नव्हतं? विजे पेक्षा चपळ अंग होतं, मानवी मनानं स्तिमित व्हाव अशी गती होती. ब्रम्हांडात अस काहीही नाही ज्याची हनुमंताच्या अंगी असलेल्या कुठल्याही गुणाशी तुलना व्हावी! आणि एवढे सर्व गुण असूनही हनुमंताला अहंकारचा वाराही लागलेला नव्हता. कारण त्याच्या अंगी पराकोटीची नम्रता होती आणि या नम्रतेन हनुमंताला देवत्व दिलं आहे.
३) युग लोटली पण एक क्षणही हनुमंताला प्रभू रामचंद्राची विस्मृती झालेली नाही. रामाचा दास असलेल्या या वानरांन स्वामी होण्याचा विचारही कधी आणला नाही हनुमंत हा प्रभुरामचंद्रानचा अनंत काळाचा दासच आहे. अभिमान वाटावा अस हे दास्यत्व आहे. या अद्वितीय दास्यत्वांन दास्य भक्तीचा नवा अविष्कार भक्ती मार्गात रूढ केला आहे. राम कथा हाच हनुमानाच्या जीवनाचा आधार आहे. हनुमंताची स्वामीनिष्ठा, आज्ञांधारकपणा, कर्तव्यनिष्ठा, चिकाटी, विनम्रता यापैकि एखादा जरी गुण आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तरी आपल जीवन उद्धरून जाईल. प्रभूरामच्न्द्रांनी ज्या ज्या आज्ञां केल्या त्यासर्व त्यांनी विना तक्रार त्याचं पालन केल. अश्या कित्येक मोठ मोठ्या कामगिर्या त्यांनी पार पाडल्यात त्या कामगिर्या म्हणजे हर प्रयत्नान कामं मार्गी लावणं,संपूर्ण तडीस नेणं याचा उत्तम वस्तू पाठ त्यांना होता.
४) त्याच प्रमाणे गुड फ्रायडे हा प्रभू येशू ख्रिस्ताचा पुण्य स्मरणाचा दिन प्रभू येशूच अवध जीवन हे शुद्धतेच, पावित्र्याचं आणि निश कलंक्तेचा वस्तूपाठ आहे. अशी गोष्ट सांगतात कि एका व्यभिचारी स्त्रीला एक जमाव दगड मारीत होता, ती गरीब अबला दगडांच्या मारान घायाळ झाली होती. त्या ठिकाणी प्रभू आले त्यांनी त्या प्रक्षुब्ध जमावाला रोखलं आणि सांगीतल– जयान कधी एकही पत्क केलेलं नाही, जो निष्पाप आहे त्यानं प्रथम या स्री वर दगड मारावा! ते एकलं आणि लोकांमध्ये चलबिचल सुरु झाली दगड मारण्यासाठी उभारलेले हात खाली आले, कारण प्रत्येकानं काहीना काही पातक केलेलं होतं जमाव पांगला प्रभुणे तिला सांगीतले जा तुला क्षमा लेलेल आहें या पुढे पाप करू नको. यावरून त्या हजारो धोंड्यांनी तिला तिच्या पातकांची जाणीव करून दिली. कारण ते धोंडे तिचं उध्वस्त जीवन सावरू शकणार नव्हते, प्रभूंच्या शब्दांनी तिला तिच्या पापांची हि जाणीव झाली. आणि त्या पश्चातापांतून पुढील नव्या जीवनाची सुरवात करण्याच मोठं बळ तिला मिळाल. सतपुरुष आणि सामान्य यां मध्ये हाच फरक आहें सामान्य माणस फक्त डागण्या देतात, तर खरे सत्पुरुष नव जीवन देतात.
Bhagwan Mahavir, also known as Vardhamana, was the twenty-fourth and last tirthankara of Jainism. He was born into a royal family in what is now Bihar
Source : Marathi Articles.