सरकारला ‘लोकपाल’ आणायचे नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘रामलीला’ सोडल्यानंतर आता या विधेयकासाठी योगगुरू रामदेवबाबा यांनी आज रामलीलावर उपोषण सुरू केले. लोकपालसाठीचा लढा संपलेला नसून आम्ही तो पुढे चालवू. सर्व भ्रष्ट लोकांना शिक्षा झालीच पाहिजे, कठोर लोकपाल तातडीने लागू करा तसेच काळा पैसा देशात परत आणा या मागण्यांना घेऊन मैदानात उतरलेले बाबा तीन दिवसांनंतर पुढील दिशा निश्चित करणार आहेत. मागील आंदोलनाच्या वेळी पोलिसांच्या कारवाईमुळे बाबांना याच मैदानावरून पळ काढावा लागला होता. रामलीला मैदानावर दुसर्यांदा आंदोलनाला उतरलेल्या रामदेवबाबांवर केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी आज टीकेची तोफ डागली.
Source : Marathi Tv.