तंत्रज्ञानाची संकल्पना, डिझाइन यांची सॅमसंगने कॉपी केल्याचा अँपल कंपनीचा दावा सॅन होजे येथील न्यायालयाच्या ९ सदस्यीय ज्युरीने मंजूर करीत १ अब्ज अमेरिकी डॉलरची (सुमारे साडेपाच हजार कोटी रु.) भरपाई देण्याचा आदेश सॅमसंगला दिला आहे. त्यामुळे कॉर्पोरट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तंत्रज्ञानाला नवा आयाम देणार्या स्टीव्ह जॉब्स यांनी आयपॉडनंतर आयफोन आणि आयपॅड यांच्या माध्यमातून कॉम्प्युटर, स्मार्टफोन यांची परिभाषाच बदलून टाकली. सॅमसंगच्या गॅजेट्सने खुद्द स्टीव्ह जॉब्सही चक्रावून गेले होते. या विरोधात त्यांनी अमेरिकेसह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, द. कोरिया या चार देशांतील न्यायालयांत दावे दाखल केले.
अँपलचे गॅजेट सॅमसंगची कॉपी
आयफोन – २ नेक्झस एस – २ स्मार्टफोन
आयफोन – ४ गॅलेक्सी एस – ३ एस
आयपॅड – १ गॅलेक्सी टॅबलेट ७ इंच
आयपॅड – २ गॅलेक्सी टॅब १0.१
Source : News Tv.