बिग बी अमिताभ बच्चन ब्लॉग आणि टि्वटरवरून लाखो चाहत्यांशी मनमोकळा संवाद होते. आता अमिताभने ‘आय एम नाऊ ऑन फेसबुक…’ असे म्हणत सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबुक’वरही आपले आकाऊंट सुरू केले आहे. काही तासातच तब्बल दहा लाख लोकांनी अमिताभ पेजला लाईक केले.
बिग बींचे येणारे आगामी चित्रपट, खासगी व्हिडीओ त्याचबरोबर काही छायाचित्रेही एफबीच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी शेअर करणार आहेत. फेसबुकवर अकाऊंट सुरू करताना बिग बी म्हणाले, ‘जास्तीत जास्त चाहत्यांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी फेसबुक हे उत्तम माध्यम असून जगभरातील चाहत्यांशी माझ्या आयुष्यातील अनुभव, प्रसंग शेअर करता येणार आहेत.
Source: Bollywood Updates.