‘धूम-३’ या सिनेमात आमिर खान चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. शिकागोमध्ये या सिनेमाचं शुटिंग सुरू झालं आहे. शुटिंगदरम्यान काढण्यात आलेले काही फोटो आता इंटरनेटवर झळकू लागले आहेत. धूम आणि धूम-२ च्या यशानंतर यशराज फिल्म्सच्या धूम-३ शुटिंग सुरू झालं आहे. अमेरिकेमधील शिकागो येथे धूम-३ चं शुटिंग सुरू आहे. या सिनेमात पहिल्यांदाच आमिर खान चमकणार आहे. आमिर खान यामध्ये नकारात्मक भूमिकेत दिसेल. या सिनेमात आमिर खान पहिल्यांदाच अभिषक बच्चनसोबत काम करणार आहे. याशिवाय सिनेमात आमिर खानच्या नायिकेच्या भूमिकेत कतरिना कैफही दिसणार आहे.
Source : Bollywood Updates.