Adhik Maas, Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles.
यावर्षी १८ ऑगष्ठ २०१२ पासून ते १६ सप्टेंबर २०१२ (शके १९३४ भाद्रपद) अधिक मास आलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत व्रतवैकल्ये म्हणजे धर्माचा गाभा आहे. हि फार उत्साहाने संपंन्न होतात. नैमित्तिक पूजेत पुरुषाचा तर व्रत वैकल्यात महिलांचा महत्वाचा भरीव असा सहभाग असतो, या व्रतांच्या मागील हेतू म्हणजे व्रत आचरनार्या व्यक्तीचे नाते निसर्ग, समाज, कुटुंब, आणि ईश्वर यांच्याशी जुळवून संसार कर्तव्य करता करता आत्मो उद्धार साधावा असाच असावा म्हणावे लागेल.तसेच भारतीय सण मानवाच्या आरोग्या विषयी तसेच आचार विचार, अडीअडचणी, संकटातून मार्ग कोणतेही संकट, कामनाकिंवा लाभ परिपूर्ण होण्या करीता ईश्वराला विनंती, आराधना करणे हाही उद्धेष ठेवून व्रत केल्या जाते. तसेच अधिक मासातही व्रत केल्या जातात. या महिन्याला पुरुषोत्तम मासं संबोधतात. बर्याच ठिकाणी असे प्रश्न उद्भवताना दिसतात कि व्रते आली कुठून ?व्रत म्हणजे काय? परंतु याचा शोध घेतल्यास प्राचीन वाड्मयात बरेच संदर्भ आढळून येतात ‘व्रत’ या शब्दाचा अर्थ अनुकरण करणे असा होतो, किंवा अर्थ निवडणे असाही होतो. बृद्धारण्यकोपनिषदान ऋषींनी व्रताची कथा अशी सांगितला कि प्रजापतीने [शिव ]मानवी देहाच्या अनेक अवयवांची निर्मिती केली. परंतु या अव्य वांत भांडणे तयार झाली. त्याचा परिणाम म्हणजे तोंड म्हणाले मी फक्त बोलणार बाकी काहीही करणार नाही, अश्या प्रकारे प्रत्येक अवयव आपापल्या मर्जी नुसार वागू लागला.त्याचा परिणाम संपूर्ण देहावर झाला, तेव्हा या अवयवानसाठी व्रत निर्मिती करावी लागली, हेच एक नेमस्त पणाचे, शरीरावर व मनावर नियंत्रण ठेवण्याचे एकमेव साधन त्यांना सुचले. असे म्हणतात. हा मास सर्व मासात श्रेष्ठ समजल्या जातो. म्हणून या महिन्यात दान धर्म करून पुण्य पदरी पाडून घ्यावे हा मासं भगवान श्री कृष्णाचा आवडीचा असल्या कारणाने याला ”पुरषोत्तम मासं” म्हणतात या महिन्यात श्री कृष्णाची पूजा होते, म्हणतात कि आपल्या कडून काही पातक किंवा वाईट कृत्ये घडली असल्यास या महिन्यातील पूजे द्वारे त्या पापांचे खंडण होवून मोक्ष प्राप्ती होते.
हे व्रत करणाऱ्यांनी राधाकृष्णाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करून. पूजा अर्चन करून निरंजन लावावे, उदबत्तीचा, धुपाचा, सुगंध दरवळीत ठेवावा. या व्रताने दुख: चिंता, दारिद्र्य नष्ट होते. संकटाला सामोरे जाण्याचे ध्यर्य प्राप्त होते मनोबल वाढते. या महिन्याचे व्रत काही कठीण नाही.या महिन्यात व्रतस्त: असताना भांडण तंटा करू नये. व्यसनापासून दूर राहावे. उपवास करावा,दुध किंवा फलाहार करावा. ब्रम्हचर्य व्रत्त पाळावे. परान्न घेवू नये. केळीच्या पानावर आहार घ्यावा. आणि शक्यतोवर जमिनीवर झोपावे. हे व्रत चालू असताना भागवत पारायण करावे. श्रीकृष्णाला तुळसदल अर्पण करावे, पूजा करावी. दानधर्म करावा. कोणत्याही प्रकारे दुध, तूप, धान्य, घंटां, दिवा, किंवा फळे दान द्यावी, यथाशक्ती मातीचे किंवा तांब्याचे कुंभ दान करावे. व्रताचे उद्यापन यामहिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी, अष्टमी, किंवा नवमी ला करावे, ३३ किवा ५ मेहून जेवायला घालावे, त्याना ३३ अनारसे भरलेले भांडे, तसेच खीरीचे जेवण घ्यावे. या महिन्यात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे.यथाशक्ती चांदीच्या ताटात ३३ अनारसे, भरून मध्यभागी निरांजन लावून, हे ताट व दक्षिणा वाण म्हणून द्यावी, दीपदाण व दक्षिणा देणे महत्वाचे मानले जाते. छिद्र असलेला पदार्थ वाण म्हणून देणे योग्य आहे, जेवढी छीद्रे असलेला पदार्थ असला तेवढ्या अगणीत वर्षाचे अधिक महिन्यातील वाणाचे पुण्य लाभते, चांदीचे तुलसपत्र देण्याची प्रथा आहे. या मासात मंगळवारी किंवा शुक्रवारी ३३ बायकांना बोलावून हळद कुंकू करावे साखर खोबरे द्यावे,शक्य असल्यास नारळाची ओटी भरावी, या मासात जमत असल्यास दररोज नदीवर आंघोळ करावी, एखादेवेळी तीर्थयात्रा किवा दररोज देवदर्शन करावे, मात्र या महिन्यात . कोणतेही शुभ कार्य, घृह प्रवेश, वास्तू शांती ,विवाह, नामकरण वै. विधी टाळावीत.
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
Source : Marathi Unlimited.