समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात तलासरी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. आमदार अबू आझमी यांची तलासरी तालुक्यातील डोंगारी आणि विलातगाव परीसरात जवळपास सत्तर एकर जमिन आहे. ही जमीन गणेशकुमार गुप्ता, आभा गुप्ता ,अबू आझमी आणि जहीरा आझमी अश्या चार जणांच्या नावावर आहे. अबू आझमी यांनी बुलडोजर लावुन शेती पुर्णपणे उद्धस्त करुन टाकल्याचा प्रकार समोर आलाय. शिवाय येथील आदिवासीना त्यांनी शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं येथील शेतकरी सांगतायेत. अबू आझमी यांच्याविरोधात तलासरी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय.
Source : Marathi TV News
Leave a Reply