सरकारी नोकरी मिळावी अशी आपणा सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र अशी नोकरी सगळयांनाच मिळते असं नाही. मात्र आता रेल्वे बेरोजगारांसाठी धाऊन आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी भूमिपुत्रांना रेल्वेत नोकरीची पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. पुढील वर्षी मध्य रेल्वेत २५७२ जागांकरिता ‘डी’ ग्रूप वर्गाची भरती सुरू होणार आहे. त्यामुळे नोकर्यांसाठी वणवण भटकणार्या बेरोजगारांना यामुळे दिलासा मिळणार आहे. गेल्या सहा वर्षांतील मध्य रेल्वेची ही तिसरी नोकरभरती आहे.
Source : Marathi Updates.