प्रथम गर्भोत्पन्न कन्या किंवा पुत्र यांचा विवाहमात्र जन्म नक्षत्रांवर जन्म दिवशी आणि जन्म मासात करू नये.द्वितीयाडी गर्भोत्पन्न कन्या किंवा पुत्र यांचा विवाह त्यांच्या जन्म मासांत किंवा जन्म वारादिकांवर केला तरी त्याचा दोष नाही.
३) जन्म मासाचा अपवाद.
व्यवहारिक अडचणीमुळे जन्म मासात किंवा जन्म नक्षत्रादिकांवर वडील कन्या पुत्रांचा विवाह कर्तव्य असेल तर त्या नक्षत्रादिकांच्या विपरीताधार्त करावा. म्हणजे पूर्वार्धात जन्म असेल तर उत्तरर्धात आणि उत्तरर्धात जन्म असता पूर्वार्धात मंगल कार्य करणे दोषयुक्त नाही. असे गर्ग, भार्गव आणि शौनक ऋषींचे मत आहे.
४) विवाह संबंधी शास्त्रार्थ !.
एका अविभक्त कुटुंबात मुलाच्या विवाह नंतर श महिन्याचे आंत मुलीचा विवाह करू नये.कारण वधू प्रवेश झाल्या नंतर म्हणजे नवीन सून आपल्या घरी आणिल्या नंतर निर्गम म्हणजे आपल्या घरातून कंन्येला प्रथम सासरी पाठविणे अनिष्ट मानिलेले आहे.परंतु संवत्सर बदलत असेल तर तर ६ महिन्यांचा नियम बाधक नाही.उदा. फाल्गुनांत एका मुलाचा विवाह झाला असल्यास चैत्र महिन्यात कनिष्ट मुलाची मुंज किंवा वैशाखात कंन्येचा विवाह करणे दोषास्पद नाही.तसेच तीन मंगल कार्ये एकाच वेळेला करू नये. एकाच अविभक्त कुटुंबात मंदना नंतर म्हणजे विवाहादी संस्कार केल्या नंतर सहा महिनेपर्यंत अनैमित्तिक मुंडन म्हणजे चौल, उपनयन, नागबली, तीर्थ यात्रा ई.संस्कार करू नये. असे बहुमत आहे; तथापि विवाह नंतर उपनयन पाहिजे तेंव्हा करावे. असे कात्यायनाचे मत आढळते.
५) सहोदराचे संस्कार!.
सख्या भावाचे, सख्या बहिणींचे,किंवा सख्याभिंभावाचे सारखे संस्कार म्हणजे मुंजी अथवा विवाह हि एकाच वेळी करू नयेत.चार दिवसांच्या निदान एका दिवसांच्या अंतरणे तरी करावे. फार अडचण असता एकाच दिवशी कर्तव्य असतील तर भिन्न स्थळी किंवा भन्न मंडपात किंवा भीन्न लग्नावर म्हणजे भिन्न वेळी करावे. सावत्र बहिण भावाचे किंवा जुळ्या भावंडांचे संस्कार एकाच वेळी केले असता दोष नाही.
६) प्रत्युव्दाह, बदलणे, साटेलोटे, आटासाटे यांवर निषेध.
आपली कंन्या ज्याचे पुत्रास दिली त्याची कंन्या आपल्या पुत्रास करुं नये. ह्याला प्रत्युद्वाह म्हणजे ”बदलणे” किंवा ”साटेलोटे” म्हणतात दालीद्र वैगरे संकट असता.प्रत्युद्वाह करण्याचीं गरज भासते.असे शास्त्र करांचे मत आहे. यावरून व्यावहारिक संकटांचा विचार करून धर्मशास्त्रांचे नियम बांधले गेले आहेत हे स्पष्ट दिसते. तसेच एक कंन्या दिलेली
जीवंत असता त्याच वराला दुसरी कन्या देऊ नये. ज्येष्ठ कंन्या जेष्ठपुत्र यांस अविवाहित ठेवून कनिष्ठ अपत्यांचे संस्कार करू नयेत. शुभ कार्यान मध्ये श्राद्धादी पितृक्रिया करू नयेत.. लग्न व घर बांधणी एकाच वर्षी करू नयेत.