विद्यार्थ्यांचा पाया !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

                         widhyarthi-jiwnacha-paya for marathi articles….

                                        विद्यार्थ्यांचा पाया !
                                                                      गुणवत्ता विकासाची अपेक्षा व सार्थकता परिश्रमाची.
sucess steps आजचे युग हे विज्ञानधिष्टीत व तंत्र  ज्ञानधिष्ठीत युग आहे. आणि त्यातच  आज झपाट्याने बदल होत आहे.मग या बदलांपासून शिक्षणासारखे क्षेत्र कसे  दूर राहतील. याही क्षेत्रात नवनवीन बदल होत आहे. शिक्षण क्षेत्राला  समाजाचा वास्तव दर्शी आरसा असे मानल्या जाते. म्हणूनच या क्षेत्रात  विविध प्रकारचे बदल व परिवर्तन होत आहे. अनेक बदलांची व परीवर्तनाची  मालिका घेऊन शिक्षण हक्काचा कायदा झाला आहे. प्रयेक बालकाला  गुणवत्ता पूर्ण शिक्षण हाच मुख्य उदेश शिक्षण हक्काच्या कायद्याचा आहे.  यासाठी कालानुरूप व काळ सुसंगत बदल घडू लागले आहेत. शिक्षणाच्या  प्रवाहातून शैक्षणिक संशोधनातून आणि प्रयोगातून साकारलेले नवे विचार,  नव्या संकल्पना, त्या संकल्प नाची पूर्तता करण्यासाठी अवलंबवयाच्या  नवनवीन पद्धती आधुनिक तंत्रे व साधने आणि काही तत्वे यांचा शिक्षण  प्रक्रियेतील प्रवेश आता सुलभ व सुकर झालेला आहे. हे बदल आजच्या व उद्याच्या शैक्षणिक विकासा साठी पूरक आणि पोषक आहेत यापरीवर्तनातून बालकांचा गुणात्मक विकास घडून येतो. शिक्षण हे समाजाची मनोभूमिका तयार करण्याचे काम करते. व त्याला मूर्त स्वरूप आपण सर्व शिक्षक बांधव करीत असतो. त्यासाठी होणार्या प्रत्येक बदलांची पार्श्व भूमी त्याप्रत्येकाची कारण मिमासा आपण समजून धेतली पाहिजे. प्राथमिक शिक्षण हे पायाभूत शिक्षण आहे. प्रथमिक, बौद्धिक,भावनिक अश्या स्तरावरील क्षमता आणि गुणवत्ताविकास अपेक्षित असतो. यासाठी प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित केली जाते, या उद्दिष्टांच्या माध्यमातूनच बालकांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जातो. सोबतच गुणवत्ता विकास साद्धय करीत असताना मुल्यमाप् नाद्वारे वेळोवेळी त्याच्या अध्ययनातील त्रुटी, अडचणी दूर होऊन त्यांची उत्तम शैक्षणिक प्रगती व्हावी व मूल्यमापन प्रक्रिया हि अध्ययन-अध्यापणावर शिक्षण प्रक्रियेच्या दर्जावर आणि परिणामी शैक्षणिक व्यवस्थेवर सुद्धा परिणाम करत असते,म्हणूनच बालकाचा गुणवत्ता विकास करण्यासाठी शाळा, विध्यार्थी पालकांन सोबत विशेष करून आपण सर्व शिक्षकांनी सुद्धा या शैक्षणिक मूल्यमापना बाबत संवेदनशील असणे गरजेचे आहे. कारण यावर शिक्षण प्रक्रियेचे नियोजंन व कार्यवाही चालक असते. यातील उणीवा, त्रुटी, आणि दोष हेच बालकांच्या शैक्षणिक, लोकजागृती आणि त्यांचा उत्तम सहभाग अतिशय महत्वाचा असतो. गुणवत्ता विकास घडवून आणायचा म्हटल्यास सहभाग व्यतिरिक्त अथक लक्षपूर्वक केलेले प्रयत्न वा तशी प्रयत्नांची पराकाष्टा, महत्वाची ठरते. आणि म्हणूनच असे म्हणतात ”प्रयत्नांची पराकाष्टा वाढविते यशाची निष्ठा” या तत्वावर बालकांचा गुणवत्ता विकास अवलंबून आहे. या साठी उत्तम यशस्वीतेची उदा, म्हणजे- भारताचा रत्न सचिन तेंदुलकर सारखा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर रोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करतो. तसेच आजूबाजूला असलेली एखादी नवीन नक्षीदार वास्तु आपले लक्ष वेधून घेते, किंवा एखाद्याचे स्वरमधुर गीत ऐकताना आपण बेभान होऊन जातो. तसेच आज नऊ-दहा वर्षाचा छोटासा मुलगा कीर्तन प्रवचन करताना आपण बघतो, आज पाच वर्षाची मुलगी काही क्षणातच कितीतरी मोठा उतारा सहजरीत्या पाठ करून घेते. हि पाठांतराची अद्वीतीय क्षमता तसेच शाळेतील लहान मुले तबला अप्रतिम वाजवितात. मग हेवा वाटावा असी हि गुणवत्ता काही योगायोगाने निर्माण झालेली नसते. त्यासाठी ईच्छाशक्ती, उत्तम नियोजन आणि अथक लक्षपूर्वक केलेले अचूक प्रयत्न यातून खरी गुणवत्ता उदयास येते. कोणत्याही कामाचा प्रत्येक टप्पा चांगल्या रीतीने पूर्ण करण्याचा आग्रह धरल्यावरच गुणवत्ता निर्माण होते. चिंता न करता कामाचे चिंतन करा. बालकाचा गुनवता विकासासाठी त्याच्या प्रत्येक पायरीवर प्रक्रिया चांगली घडत राहील याची काळजी घेतल्यास कार्यात नक्की यश मिळेल गुणवत्ता विकासामध्ये लोक सहभाग तसेच विद्यार्थ्याचा सहभाग तितकिच महत्वाची भूमिका आहे.आपल्या मुलांवर संस्कार करताना त्याच्या मनात काय सुरु आहे याचा कयास घेता यायला पाहिजे. कारण माणसाच्या मनाचा थांग लागणे फार कठीण असते,पण तरी हे महत्वाचे आहे. तसेच शिक्षकाने मुलांचे मन समजून घेणे आवशक आहे. गुणवत्ता विकासात शिक्षकांचा व  तसाच  विद्यार्थ्याचा  चैतन्य पूर्वक सहभाग प्राप्त करून घ्यावा प्रत्येक कार्याची कार्यवाही मनापासून होणे तितकेच महत्वाचे आहे. यात शिकणार्याची व शिकविनार्याची प्रबल ईच्छा व प्रयत्न असावे. सहभागाचे सातत्य हवे, शाळेत मिळालेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्याने स्वत:च्या वां स्वत:शी दैनंदिन जीवनाशी सम्बंध जोडता यावे. काळाच्या ओघात बहुतेक तपशील विस्मरणात जातात. भावी जीवनात काही गोष्टीचा वापर कधीच केला जात नाही. मग शिक्षणातून काय मिळविले वां मिळाले ?या सारखे प्रश्न आपल्या समोर आवासून उभे राहतात.कोणतेही कार्य आवडीने केल्यास ओझे वाटत नाही. मनापासून केलेला स्वीकार आणि गर्जेनुसार बदललेला दृष्टीकोन अपयशाचे ओझे कमी करतो. शिक्षक हा विद्यार्थी व पालक ह्यांच्याशी जुळलेले अत्यंत महत्वाचे योग किंवा दुवाच म्हटली पाहिजे असे हे गुरु म्हणून जर का लाभलेत तर विद्यार्थ्यांचे जीवन सार्थकी लागल्या शिवाय राहणार नाही, जीवनाशी त्यांचा नित्यनवा संबंध येतो. या संबंधाला समृद्धी देण्यासाठी शिक्षकांनी नवे विचार,नवे ज्ञान यांचा वेळोवेळी अभ्यास केला पाहिजे. अद्यावत ज्ञान व पद्धती अवलंबून शाळांमध्ये बालकांच्या गुणवत्ता  वाढीचा ध्यास घेतला पाहिजे हीच खरी सार्थकता आहे.
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
Source : Marathi Unlimited.
Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा