दिवसाच्या प्रथम होर्याचे जे नाव असते तेच त्या वरांचे नाव असते. त्याचा स्पष्टार्थ असा आहे कि, वारांनवर ग्रहांचे अधिपतित्व असते. अहोरात्राचे २४ विभाग कल्पून कित्येक विभागास होरा अशी संज्ञां दिलेली आहे. असे समजुती करिता आपण होरयाला पाहिजे तर तास किंवा कलंक म्हणू शकतो. पृथ्वी सभोवती फिरणारे सात ग्रह हे त्या २४ तासांचे किंवा होरयाचे अधिपती मानिलेले आहेत. त्यांचा कर्म प्रथम शनी, नंतर त्याच्या खाली अनुक्रमाने गुरु, मंगल, रवी, शुक्र, बुध आणि चंद्र असा आहे. याच सात ग्रहांचे पुन:पुन:फेरे होतात. म्हणजे ग्रह सात आणि अहोरात्राचे होरे २४ म्हणून अहोरात्रांत २४ भागिले ७ बरोबर ३ या प्रमाणे सात ग्रहांच्या पुन:पुन:तीन आवृत्या होऊन चवथ्या आवृतीचे तीन तास शेष राहिले: त्या तीन तासांना चवथ्या फेर्ऱ्यांचा चवथा ग्रह, जो उगवत्या दिवसाच्या पहिल्या होर्याचा किंवा तासाचा अधिपती असतो तोच वार होय. उदाहरणार्थ शनी पासून होर्याचा आरंभ मोजावा म्हणजे त्यापासून चवथा रवी येतो, म्हणून शनीच्या पुढील रविवार होय. त्याच प्रमाणे रवीच्या पुढे चवथा चंद्र, चंद्र पासून चवथा मंगळ ईत्यादी. वारांची उत्पत्ती होऊन सुमारे पांच हजार वर्षे झाली असावी, असे विद्वान ज्योतिशांचे म्हणणे आहेत. ऋग्वेदान सारख्या प्राचीनतम ग्रंथात याच क्रमाने वारांची नावें आढळली तर वारांची उत्पत्ती याहूनही प्राचीन ठरेल.
Source : Marathi Unlimited.