* सलादाची चव वाढविण्यासाठी मुळ्याचा वापर केला जातो. मुळा जसा आपली चव सांभाळतो तसाच आरोग्यही. तेव्हा जाणून घेऊ मुळ्यातील औषधी गुण.
* अजीर्णाचा त्रास असणार्यांनी आपल्या जेवणात मुळा अवश्य खावा, मुळ्याच्या गोल चकत्या कापून त्यावर मीठ घालावे. हवे तर आल्याचा व लिंबाचा रस हि घालावा. त्यामुळे अजीर्ण दूर होऊन भूक हि चांगली लागते.
* मूल्याची पाने सावलीत सुकवून कुटून ठेवावी. त्यात सम प्रमाणात साखर मिसळून सुमारे दोन महिने सतत दोन वेळा खाल्यास मुळव्याध नष्ट होते.
* मुळ्यांचा रस किंवा मुळ्याच्या बियांचा रस काही आठवडे. घेतल्यास मुतखडा विरघळून नष्ट होतो.हा प्रयोग मूत्रावरोध, मुत्र्कृच्छांतही फायदेशीर आहे.
* जर कानदुखीचा त्रास असेल तर पुढील प्रयोग आजमावून पहा.सुमारे ३० ग्र्याम मुळ्याच्या पानांच्या रसात १०-१२ ग्र्यंम मोहरीचे तेल मिसळून मंद जाळावरशिजवून घ्या त्यातील पाण्याचा अंश नष्ट झाल्यावर तो गाळून बाटलीत भरून ठेवा. कान दुखत असल्यास एक किंवा दोन थेंब तेल सोडा. थोड्या वेळाने दुखणे थांबेल.
* जर खोकला असेल तर दीड कप उसाच्या रसात अर्धा कप मुळ्याचा रस मिसळून रोज सकाळी काही दिवस घेतल्यास खोकला थांबेल.
Source : Marathi Unlimited.